kalash_230420_b_
कुटुंबात असे काही व्यक्ती असतात ज्यामध्ये आपले आई-वडील मोठा भाऊ, बहीण, पती किंवा पत्नी, ज्यांची अध्यात्मिक विचार सरणी थोड्या वेगळ्या पद्धतीची असते. आम्हाला सर्व समजते या विचाराने त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांचा हस्तक्षेप चालत नाही. आणि आम्ही खूप दिवसांपासून या गोष्टी करत आलो आहोत, आम्हाला तुम्ही शिकू नका. या मानसिकतेमध्ये ते इतर लोकांना त्यांच्या कामात हस्तक्षेप करू देत नाही. किंबहुना त्यांच्या (इतरांच्या) चुका काढण्यात वेळ घालवतात. यामुळे कुटुंबातील नवीन सदस्यांना, मुलांना घरातील कुलधर्म-कुलाचार, अध्यात्मिक उपासना करताना “आमच्याकडून काही चुकले तर काही होणार नाही ना” या भीतीने ते त्या गोष्टी करून देतच नाही. आणि यामुळे अनेक कुटुंबात अध्यात्मिक परंपरा कुलधर्म कुलाचार या गोष्टी नवीन पिढी शिकत नसल्यामुळे कुटुंबात अध्यात्मिक वारसा राहत नाही. अध्यात्मिक उपासना करताना एखाद्या नवीन माणसाकडून एखादी गोष्ट चुकली किंवा त्याला ती नाही जमली, तर मोठ्या प्रेमाने घरातील अनुभवी माणसांनी त्याला जर योग्य पद्धतीने समजून सांगितले, त्याचे मनातली भिती घालवली तर मोठ्या आनंदाने उपासना करण्यास नविन पिढी तयार होईल. परंतु खूप नियमांची भीती व अवडंबर दाखवल्यास त्यांना या गोष्टीत कधी आनंद आणि सहभाग घ्यायला आवडणार नाही.

म्हणून या अक्षय तृतीया च्या दिनी घरात अन्नाचे दोन गोड पदार्थ कमी शिजले तर चालतील, परंतु आपल्या घरात असणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांची माहिती, त्यांची कर्तबगारी, कुलधर्म-कुलाचार, त्याचे अध्यात्मिक महत्व व संस्कृतीची जोपासना काळानुसार वेळेनुसार आणि सोप्या पद्धतीत, भीती न घालता, आनंदी वातावरणात शिकवण्याचा संकल्प आपण करूया. जेणेकरून पुढची पिढी अध्यात्मिक उपासनेत अक्षय्य कार्यरत राहील.

आपले संपुर्ण परिवारास अक्षय तृतीया पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा… अक्षय्य गुरुसेवा हाच अक्षय तृतीया चा सगळ्यात मोठा ठेवा.