- देव्हाऱ्याच्या मागील भिंत आपण वॉलपेपर लावून किंवा टेक्शरपेंटने सजवू शकतो. फ्रॉस्टेड किंवा स्टेन ग्लास लावून आतून एलइडी स्ट्रीप फिरविल्यास फारच सुंदर लूक येतो. आजकाल एम.डी.एफ. किंवा पीव्हीसीचे सुंदर पॅनेल्स बाजारात मिळतात. ते मागील भिंतीवर किंवा दोन्ही बाजूला लावून त्यामधून लाइट इफेक्ट्स देऊ शकतो.
- कुठलेही फॅब्रिक किंवा पैठणीसारख्या साडीचा पदर वापरून देव्हाऱ्यामागे छान बॅकग्राउंड करू शकतो. आपल्या कुलदैवताचा किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांचा फोटो या भिंतीवर लावून मंदिरासारखे पवित्र वातावरण निर्माण करू शकतो.
- देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूस किंवा छतावरून देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूस दोन समया किंवा समईसारखे दिवे खाली सोडल्यास अगदी पारंपरिक लुक येतो.
- देवघर हे पूर्व-पश्चिम असतेच. देवघरात एका कोपऱ्यात एक छोटेसे बेसिन बसवावे. पाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. दारामागे एक हूक किंवा टाय रॉड लावून घेतल्यास देवाची वस्त्रे वाळविण्याची सोय होते.
- देवघरासाठी स्वतंत्र खोली नसेल, तर डायनिंग रूम किंवा गेस्टरूममध्ये बैठे किंवा भिंतीवर देवघर बनविता येते. तेही शक्य नसेल, तर स्वयंपाक घरात ओट्या शेजारी किंवा ओट्यावरील शेल्फ्समध्ये देवघर बनविता येते.
- दिवसभरात काही वेळासाठी रोजची धावपळ, दगदग, टेन्शन्स विसरून देवाचे केल्यास निश्चित फायदा होतो. शारीरिक स्वास्थ्यासाठी रोज जीमला जाण्याइतकेच मानसिक स्वास्थ्यासाठी ते आवश्यकही आहे.