Latest Entries »

माहिती : भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे सदरील भूमी मध्ये अनेक प्रकारचे राज यज्ञ,ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तापोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात,त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाण द्वारे रचना तयार करायची सुधा एक पद्धत आहे .क्रमश…DSCN1151 (2)

माहिती :: भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे .सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे.या संगम स्थानी “भगवान श्री नृसिंह सरस्वती ” नित्यस्नान करत असत. या संगमा भोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित.निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात.पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. क्रमश….

 

swamidarshan

Swamidarshan

!! श्री स्वामी समर्थ तारक मंत्र !!

 

नि:शंक हो निर्भय हो मना रे।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे।

अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।

अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय।

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेविन काळ ना नेई त्याला।

परलोकीही ना भिती तयाला॥२॥

उगाची भितोसी भय हे पळु दे।

जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे।

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।

नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥

खरा होई जागा श्रद्धेसहीत।

कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।

कितीदा दिला बोल त्यांनीच हात।

नको डगमगु स्वामी देतील साथ॥४॥

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।

स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती॥५॥

**॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**

——————————————————————————————————————

असा हा “श्री स्वामी समर्थ” तारक मंत्र प्रत्येकाने दररोज किमान  तीन वेळा किंवा निदान एक वेळा तरी म्हणावा.

तारक मंत्र : गंभीर प्रसंगी तारक मंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची विभूती एका पेल्यातील पाण्यात पडू द्यावी. तारक मंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्रश्न करावे तसेच घरातील इतरांनाही द्यावे.

|| श्रीगणेशाय नम: ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||

ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||

कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||

पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती ||

शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा

प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||

दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती

म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली

महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता

अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||

सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||

शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||

चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||

पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४

हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||

करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||

निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||

पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||

पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||

प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ ||

नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||

हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||

मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||

“स्वामी लीला”
एके दिवशी गणपतीचे मंदिरात पलंगावर श्रीँची स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनास आले. त्यांत एक व्यापाऱ्‍यास ते रागारागानेँ म्हणाले,
“क्योँ जी, हमारा डालिँब ला दो..!”
असे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला, ‘महाराज, जी आपणांस एका कामात नवस केला होता. त्याप्रमाणे माझे काम झाले’ म्हणून एका रुपयाची दोन डाळिँबे आणली; परंतु ती पाकिटांत विसरुन गेलो. क्षमा करावी. लगेच त्याने मनुष्य पाठवून ती डाळिँबे महाराजांचे पुढ्यात ठेवली.

सुखाचे क्षण हे उन्हात पडणा-या गाराप्रमाणे असतात. क्षणात वेचले गेले नाही तर गाळात विरून जातात.

अश्रू कितीही श्रेष्ठ व प्रेमाचे असले तरी गेलेले प्राण परत आणण्याचे सामर्थ्य त्यात नसते.

प्रगतीचा मार्ग चुकांच्या कट्याकुट्यातून जातो, जो या काट्याकुट्यांना भितो, त्याची कधीच प्रगती होत नाही.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे, जसा सूर्य झाकला जात नाही. तसेच  सत्य देखील झाकले जात नाही .

स्वतःच्या वाटेला कितीही काटे असले तरी दुस-याला  सुखद फुल देणे, हे मानवाचे परम कर्तव्य आहे.

ईश्वराच्या कृपेशिवाय मनुष्य केवळ आपल्या प्रयत्नाच्या जोरावर काहीही प्राप्त करू शकत नाही.

देशातील दारिद्र्य व अज्ञान  घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे.

घाम गाळल्याशिवाय मिळालेली धन-संपत्ती हि टिकाऊ नसते.

लोक निंदा करोत अगर प्रशंसा  परंतु धैर्यशील पुरुष स्वतःच्या मार्गावरून विचलित होत नाहीत.

अवदशेत सापडला कि मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो. पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीही जाणून घेत नाही.

परिस्थितीचा गुलाम होण्याऐवजी तिच्यावर मत करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

सतत दुःखाचा विचार करून आत्महत्या करण्यापेक्षा  ईश्वराला तळमळीने शरण जा तो तुम्हाला नक्कीच तारील.
थोर संत किंवा  थोर पुरुष असामान्य गोष्ट करत नाहीत, तर साध्याच गोष्टीना असामान्य करतात.

जो मनुष्य आपल्या बुद्धी व शक्तीचे माप काढून काम करण्यास सरसावतो, तो कधीही निराश होत नाही.

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे व ज्याला आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याला काहीही अशक्य  नाही. 

जोवरी पैसा तोवरी बैसा ही आजच्या जगाची रीत आहे.

जे काम आज करता येणे शक्य आहे, ते उद्यावर ढकलू नये.

चुकांची भीती बाळगू नका,  पण तीच चूक पुन्हा करू नका.

विचार बदलले  कि कृती बदलते व कृती बदलली कि कर्म पण, विचार बदलण्यासाठी मात्र मन ताब्यात असावे लागते.

स्वतः आचरण संपन्न होऊन दुस-याला नंतरच उपदेश करा. व्यर्थ भाषणबाजी करू नका. तुम्ही आचरण करत असाल तरच लोक तुमचा उपदेश ऐकतील.

स्वार्थी माणसाला दुसरा स्वार्थी भेटला तर जमिनीपर्यंत वाकून एकमेकांना भेटतात. पण या जगातील सर्व  इच्छांचा  त्याग केलेल्या निराधार पुरुषाला कुणी केवळ शब्दाने सुद्धा किंमत  देत नाही.

कोणतेही कार्य सुरु करण्याचे अगोदर ते कार्य करण्याचे प्रयोजन समजावून घेतले पाहिजे. प्रयोजन समजल्याशिवाय कार्यास आरंभ केल्यास त्या कार्याची हानी होते.

यश प्राप्त करावयाचे असल्यास त्यासाठी अनंत परिश्रम करावे लागतात. काही वेळेला सुरुवातीस त्यात अपयशही येते, पण त्यामुळे निराश न होता प्रयत्नांची पराकाष्टा करत राहिल्यास ते महान यश निश्चितच आपणास मिळते, म्हणू अपयशाने ते कार्य सोडू नका, पुन्हा प्रयत्नाला  लागा.

अतिशय कठीण प्रसंगातही जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवतो तोच खरा भक्त .

पैसा,धन,संपत्ती कमावणे योग्य असेलही,परंतु सात पिढ्यांसाठी त्याची तरतुद करणे हे कितपत योग्य आहे.विचार करा,तुम्हीच ठरवा…!

कृती करून विचार करण्यापेक्षा विचार करून कृती करा…!

जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा परीक्षार्थी असतो. जेव्हा तो कष्ट व जिद्द या दोन गोष्टी आत्मसाथ करतो,तेव्हाच तो जीवनाच्या परीक्षेत यशस्वीपणे  उत्तीर्ण होतो.

swamidarshan

!! Swamidarshan !!

“स्वामीलीला” एकवेळ एका ब्राम्हणाकडे जाऊन महाराजांनी खाण्यास दशमी मागितली. ब्राम्हणाने सांगितले ‘महाराज, दारात गाय आहे, पण ती दुध देत नाही.’ हे शब्द ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठिवर हात फिरवून म्हणाले ‘बाई, हा ब्राम्हण कुटुंबवत्सल आहे. याजवर तुम्ही अवकृपा का करिता? यास दुध देत जा.’ असे गाईजवळ बोलून ब्राम्हणास सांगितले. ‘आज तू हिचे दुध काढुन मला दशमी करुन ठेव, मी संध्याकाळी येईन.’ त्या ब्राम्हणाने महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दुध काढायला घेतले आणि काय आश्चर्य! गाईने भरभरुन दुध दिले. त्या ब्राम्हणाने दुधाची दशमी करुन ठेवली. महाराजांनी संध्याकाळी येऊन ती खाल्ली. ॥श्री स्वामी समर्थ॥

shri swami samath

॥श्री स्वामी समर्थ॥

येवला (नाशिक ) येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये काढलेली स्वामींची अप्रतिम रांगोळी. संकलन -www.swamidarshan.com

येवला (नाशिक ) येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये काढलेली स्वामींची अप्रतिम रांगोळी.
संकलन -www.swamidarshan.com