Category: स्वामीदर्शन


kalash_230420_b_
कुटुंबात असे काही व्यक्ती असतात ज्यामध्ये आपले आई-वडील मोठा भाऊ, बहीण, पती किंवा पत्नी, ज्यांची अध्यात्मिक विचार सरणी थोड्या वेगळ्या पद्धतीची असते. आम्हाला सर्व समजते या विचाराने त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांचा हस्तक्षेप चालत नाही. आणि आम्ही खूप दिवसांपासून या गोष्टी करत आलो आहोत, आम्हाला तुम्ही शिकू नका. या मानसिकतेमध्ये ते इतर लोकांना त्यांच्या कामात हस्तक्षेप करू देत नाही. किंबहुना त्यांच्या (इतरांच्या) चुका काढण्यात वेळ घालवतात. यामुळे कुटुंबातील नवीन सदस्यांना, मुलांना घरातील कुलधर्म-कुलाचार, अध्यात्मिक उपासना करताना “आमच्याकडून काही चुकले तर काही होणार नाही ना” या भीतीने ते त्या गोष्टी करून देतच नाही. आणि यामुळे अनेक कुटुंबात अध्यात्मिक परंपरा कुलधर्म कुलाचार या गोष्टी नवीन पिढी शिकत नसल्यामुळे कुटुंबात अध्यात्मिक वारसा राहत नाही. अध्यात्मिक उपासना करताना एखाद्या नवीन माणसाकडून एखादी गोष्ट चुकली किंवा त्याला ती नाही जमली, तर मोठ्या प्रेमाने घरातील अनुभवी माणसांनी त्याला जर योग्य पद्धतीने समजून सांगितले, त्याचे मनातली भिती घालवली तर मोठ्या आनंदाने उपासना करण्यास नविन पिढी तयार होईल. परंतु खूप नियमांची भीती व अवडंबर दाखवल्यास त्यांना या गोष्टीत कधी आनंद आणि सहभाग घ्यायला आवडणार नाही.

म्हणून या अक्षय तृतीया च्या दिनी घरात अन्नाचे दोन गोड पदार्थ कमी शिजले तर चालतील, परंतु आपल्या घरात असणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांची माहिती, त्यांची कर्तबगारी, कुलधर्म-कुलाचार, त्याचे अध्यात्मिक महत्व व संस्कृतीची जोपासना काळानुसार वेळेनुसार आणि सोप्या पद्धतीत, भीती न घालता, आनंदी वातावरणात शिकवण्याचा संकल्प आपण करूया. जेणेकरून पुढची पिढी अध्यात्मिक उपासनेत अक्षय्य कार्यरत राहील.

आपले संपुर्ण परिवारास अक्षय तृतीया पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा… अक्षय्य गुरुसेवा हाच अक्षय तृतीया चा सगळ्यात मोठा ठेवा.

 

 

  1. देव्हाऱ्याच्या मागील भिंत आपण वॉलपेपर लावून किंवा टेक्‍शरपेंटने सजवू शकतो. फ्रॉस्टेड किंवा स्टेन ग्लास लावून आतून एलइडी स्ट्रीप फिरविल्यास फारच सुंदर लूक येतो. आजकाल एम.डी.एफ. किंवा पीव्हीसीचे सुंदर पॅनेल्स बाजारात मिळतात. ते मागील भिंतीवर किंवा दोन्ही बाजूला लावून त्यामधून लाइट इफेक्‍ट्‌स देऊ शकतो.
  2. कुठलेही फॅब्रिक किंवा पैठणीसारख्या साडीचा पदर वापरून देव्हाऱ्यामागे छान बॅकग्राउंड करू शकतो. आपल्या कुलदैवताचा किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांचा फोटो या भिंतीवर लावून मंदिरासारखे पवित्र वातावरण निर्माण करू शकतो.
  3. देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूस किंवा छतावरून देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूस दोन समया किंवा समईसारखे दिवे खाली सोडल्यास अगदी पारंपरिक लुक येतो.
  4. देवघर हे पूर्व-पश्‍चिम असतेच. देवघरात एका कोपऱ्यात एक छोटेसे बेसिन बसवावे. पाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. दारामागे एक हूक किंवा टाय रॉड लावून घेतल्यास देवाची वस्त्रे वाळविण्याची सोय होते.
  5. देवघरासाठी स्वतंत्र खोली नसेल, तर डायनिंग रूम किंवा गेस्टरूममध्ये बैठे किंवा भिंतीवर देवघर बनविता येते. तेही शक्‍य नसेल, तर स्वयंपाक घरात ओट्या शेजारी किंवा ओट्यावरील शेल्फ्‌समध्ये देवघर बनविता येते.
  6. दिवसभरात काही वेळासाठी रोजची धावपळ, दगदग, टेन्शन्स विसरून देवाचे केल्यास निश्‍चित फायदा होतो. शारीरिक स्वास्थ्यासाठी रोज जीमला जाण्याइतकेच मानसिक स्वास्थ्यासाठी ते आवश्‍यकही आहे.

देव मानला तर आहे आणि तो आहेच 

“मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ” ही म्हण तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना . ज्यांना परमेश्वराला shortcut  मध्ये आणिbypass way ने भेटायचं आहे आणि असत .माझ्या बोलण्याचा रोष हा “आस्तिक -नास्तिक” ह्या मुद्यावर नाहीच. परमेश्वराला मानन आणि त्याची भक्ती करण हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे . मला फक्त इथे माझा अनुभव सांगावसा वाटला आणि तो ही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला. 
बदलापूरची ” स्वामी समर्थवाडी” म्हंटल कि माझं मन हे एकदम “आनंदी आनंद गडे” होत असत . कारण समर्थवाडीच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे  . तिथे आदिदतात्रय , तसेच दत्गुरुंचे १६ अवतार,स्वामी समर्थ  ,रेणुका देवी , मारुती मंदिर , दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अश्या तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते .तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळीना सोवळ आणि स्त्रियांना साडी आणि अघोळ करुन देवाची म्हणजे देवांच्या मूर्तींची  स्व हस्ताने पूजा करणे (दत्तगुरू आणि मारुती ह्यां मूर्त्यांना  स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम ). तसचं इथे १५० गाई , ५ श्वान , दोन बलदंड हत्ती , इमू , आणि बदके हे हि वाडीच एक वैशिष्टच आहे.  
ह्या गुरूपुर्णीमेला मला हा सुंदर अनुभव अला तो असा कि, ह्या गुरुपोर्निमित मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाडीत गेले होते आणि ह्या वेळी स्वामीसखाचे म्हणजेच गुरूंचे पाद्द पूजन पण करायचे होते ते ही रात्री १०. ३० ला. जवळ जवळ ५०० लोकं त्यावेळी तिथे हजर होते पाद्द पूजनासाठी .सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसच मलाही उपासना आणि सेवा दिली गेली. दत्त मंदिर , गुरुपंच्यातन मंदिर झाडूनपुसून clean करणे. आणखी एक गोष्ट ती ही कि प्रामुख्याने  तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात . 
त्यावेळी माझ्या बरोबर आई किवां कोणीही घरातले असे नव्हतेच .दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती , सेवेनंतर पद ,आरत्या ,जपमाळा , पालखी अश्या उपासना सुद्धा चालू होत्या.वाडीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत .सतत तोंड न चालवणे म्हणजे खात बसू नये ,बडबड ,गप्पा-ठप्पा नाहीत. आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष्य ठेवायचं. 
स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्द पूजन हे दत्त मंदिरात होणार होत.  पण भक्तगण एवढे वाढले होते कि तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना. सरळ ते गुरुपंच्यातनमध्ये जावून बसले . एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे धोधो पाऊस हा चालूच होता . आजूबाजूला रान जंगल असाव अशी गर्द  झाडी. पायाखाली वाटेत काय यॆइल त्याचा बेत नाही नेम नाही . प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते . आणि जस ज्यांना समजल कि पूजा हि दत्त मंडपात नाही आहे तसं जो तो गुरूंच्या दर्शनाला गुरु पंच्यातन मध्ये गेला. संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला. आणि मी आपली एकटीच तिथे ४ / ५ स्त्रियान सोबत गुरु येतील अशी वाट बघत होते. आयत्या वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मलातर कल्पना अलीची नाही. मग तिथेच एक काका होते त्यांनीच मला विचारलं “तू इथे काय करतेस?? तुला गुरुंच पूजन करायचं आहे ना ?? मग तिथे गुरुपंच्यातन मध्ये जा . तिथे तो कार्यक्रम चालू आहे.” हे काकाचं बोलण एकून मी खूपच घाबरून गेले होते .कारण ते ह्यासाठी कि , एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका   battery च्या प्रकाशावर काळोखातून जायचं होत आणि आजूबाजूला किवां वाटेत काही साप वगेरे आला तर ?ह्या भीतीने मला अक्षरशा आईचीच आठवण आली होती. स्वामिना हाक मारली , आता तुम्हीच सोबत चला ह्या भयाण अंधारात आणि मी  कशीतरी त्या काळोखातून वाट काढत गेले . धो धो पाऊस चालू होता तो वेगळाच.पोहचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं  तर बाप्परे केवढी गर्दी लोकांची !!म्हंटल आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार . त्यात जवळ जवळ ५०० लोकं भर पावसात उभी होती . त्या गर्दीत उभ राहणार. तेवढ्यातच एक काकी एकदम बोल्या तू इथून ये. त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्या वेळी ते  खूप नवल वाटलं आणि अवाक वहायला झाल कि तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोकं उभी होती , लहान मुलानबाळासोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता, गर्दीत उभी न राहता मला २ मिनिटांनमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजा हि गुरूंची करायला मिळणार होती.  
(वाडीत गर्द अंधार आहे कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अश्या ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळू हळू पुढे सुख सुविधा होतील . केल्या जातील, आणि होतही आहेत. तसे दिवे आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत . ) 
 
मला एवढंच सांगावस वाट्त कि आपण एकट जरी कुठे असलो , तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात . त्यांना बरोबर कळत असत आपला भक्त काय करतो आहे. त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून , आवडीने करतो आहे आणि मग ते (आपला देव / स्वामी समर्थ ) आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर , सोयीस्कर करत असतात, करत जातात . म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली कि बरोबर भक्ती साध्य होते आणि अपोआप मग परमेश्वरावरचा विश्वास साध्य होतो . श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ 
 
Ms. Suchitra J Ayare
Worli , Mumbai 18 ..
 

” गुरु चरित्र पारायण सेवेने बदलेल आपले संपूर्ण आयुष्य ” ::: —-विविध स्वामी सेवा केंद्रांवर स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र वाचनाची दिव्य संधी …( दिनांक २१.०४.२०१४ ते २७.०४.२०१४) “श्री गुरूचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो. या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज-श्रीपाद श्रीवल्लभ महाराज-श्रीनृसि ंहसरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांपैकी काही लीलांचा समावेश केला आहे.अति दुःखी व पीडित तसेच विविध बाधांनी किंवा  कोणत्याही समस्येने  त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्याचे दुःख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते, त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रुपांतर होवून प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी चिरःकाल टिकते…… सर्व स्वामी भाविकांना विनंती कि त्यांनी आपल्या जवळ असलेल्या स्वामी सेवा केंद्रात, श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळात गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायणात सहभागी व्हावे. व स्वामी सेवेची संधी सोडू नये. या विषयी अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या केंद्रात संपर्क करावा.

*****स्वामी जप *****

स्वामी स्वामी जपता

तुम्ही स्वामिमय  होता

आनंदाचे भरते येते

स्वामिना बघता

नको नको तुम्हाला

 कुणीही कधीही मध्यस्त

स्वतः च स्वामी देतील तुम्हा

सुख आणि स्वास्थ

रक्षण करतील सदैव तेही

कसली तुम्हा  भीति

निशंक मनाने भजता तुम्हा

येईल स्वतःस प्रचीती

अंधश्रद्धा नको ठेवू  तुम्ही

पण ठेवा ना  विश्वास

स्वामींचा साक्षात्कार घडावा

हीच कामना खास

प्रिन राम म्हात्रे

२२-३-२०१४

** पुणे शहरात प्रथमच : सामुदायिक स्वामी नामस्मरण सोहळा**
रविवार दि. २३ मार्च २०१४, दुपारी ३.३० ते ६:०० वाजता.
स्थळ : श्री शंकर महाराज समाधी मठ, पुणे-सातारा रोड,
धनकवडी, पुणे, महाराष्ट्र – ४११ ०४३
संपर्क : प्रथमेश लोके [9821941819]

स्वामी भक्त हो, पुणे शहरामध्ये सामुदायिक स्वामी नामस्मरण सोहळ्याचा कार्यक्रम कधी होणार याची विचारणा सातत्याने होत होती. तेव्हा सर्व पुणेकरांच्या विनंतीला मान देऊन स्वामीकृपेने रविवार दि. २३ मार्च २०१४, दुपारी ३.३० वाजता पुणे येथे धनकवडीच्या शंकर महाराजांच्या समाधी मंदिरात सामुदायिक स्वामी नामस्मरण आयोजन केले आहे. तरी सर्वांनी शंकर महाराजांच्या समाधी दर्शनाचा तसेच तेथे होणार्या या सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचा लाभ घ्यावा हीच विनंती. पहिल्या वहिल्या सामुदायिक नामस्मरणाला अगत्याने उपस्थित राहावे व नामस्मरण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

पुण्यातील हे पहिलेच सामुदायिक नामस्मरण श्री शंकर महाराजांच्या समाधी मंदिरात संपन्न होणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा मठ सिद्ध स्थान असून येथे श्री शंकर महाराजांचा निरंतर वास आहे. अशा सिद्धस्थानी स्वामींचे सामुदायिक नामस्मरण करता येणे हि आमच्या दृष्टीने परमभाग्याची गोष्ट आहे. या क्षणाची आम्ही सर्व स्वामी भक्तांनी खूप वाट पाहिली आणि आता स्वामींनी व शंकर महाराज आपली इच्छा लवकरच पूर्ण करत आहे याचा आम्हाला अत्यानंद आहे. तरी सर्व पुणेकर स्वामी भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सामुदायिक नामस्मरणाच्या या ब्रह्मानंदामध्ये सहभागी व्हावे.

आपला नम्र,
प्रथमेश लोके
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार.

सिधेश्वर एक्सप्रेस ने सोलापुर – अक्कलकोट वारी

श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय मुंबई. (रजि)

|| अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधीराज योगीराज महाराज परब्रम्ह सद्गुरू श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

हा असा ग्रुप आहे की प्रत्येक महिन्यात अक्कलकोट वारी करतो गेली १० वर्ष सतत न चुकता. महिच्या एका शनिवारी रात्रि निघतो. सोलापुर एक्स्प्रेसने आणि रविवारी रात्रि अक्कलकोट वरुन मुंबई ला परत यायला निघतो. जवळ जवळ १०० भक्त जन सहभागी असतात. तिकडे जाऊं स्वामी ची सेवा, नामास्स्मरण, भजन, इत्यादी कार्यक्रम असतात. संपूर्ण भक्तीचे वातावरण असते. तर जरुर एकदा आमच्या सोबत अक्कलकोट वारी ला नक्की या………..

आपले स्वागतच करतो….

अक्कलकोट स्वामी समर्थ वारीच खर्च: =

प्रत्येकी = १000 रुपये असेल
जेष्ट नागरिक = ८00 रुपये असेल
३ ते ५ वर्षातील मुले = २00 रुपये असेल
५ ते ११ वर्षातील मुले = ७00 रुपये असेल

त्यात यायचा – जायचा ट्रेन च खर्च, सोलापुर वरून बस चा खर्च , सकाळ चा नास्ता, रात्रि चे जेवण असेल.

विशेष सूचना:
१} वारी ची टिकिट लवकरात लवकर बुकिंग करावी . उशिरा बुकिंग होणार नाही.
२} वारी ला येताना प्रतेक भाविकाने आपले फोटो असलेले ओळख पत्र बरोबर आणावे.
3} टिकिट काढल्या नंतर ती रद्द होणार नाही, जार कोणा टिकिट रद्द करावयाची असेल तर,
टिकिट च खर्च = ७०० आणि दंड = १००
असा ८०० खर्च आकारण्यात येईल याची भक्तानी नोंद घ्यावी.

याची भक्तानी नोंद घ्यावी.
जर कोणत्या भक्तला याचे असेल तर भाविकानी लवकर लवकर नावे नोंदवावी.

संपर्क:
प्रवीण गबाले:- ९९८७३३५२१८
संदेश हाडये. – ९८९२८३७६३३
मंदार सावंत. – ९९३०१७९६०७

तर मग येणार न नक्की वारी ला…

ll श्री स्वामी समर्थ ll

!! श्री स्वामी समर्थ तारक मंत्र !!

 

नि:शंक हो निर्भय हो मना रे।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे।

अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।

अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय।

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेविन काळ ना नेई त्याला।

परलोकीही ना भिती तयाला॥२॥

उगाची भितोसी भय हे पळु दे।

जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे।

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।

नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥

खरा होई जागा श्रद्धेसहीत।

कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।

कितीदा दिला बोल त्यांनीच हात।

नको डगमगु स्वामी देतील साथ॥४॥

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।

स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती॥५॥

**॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**

——————————————————————————————————————

असा हा “श्री स्वामी समर्थ” तारक मंत्र प्रत्येकाने दररोज किमान  तीन वेळा किंवा निदान एक वेळा तरी म्हणावा.

तारक मंत्र : गंभीर प्रसंगी तारक मंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची विभूती एका पेल्यातील पाण्यात पडू द्यावी. तारक मंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्रश्न करावे तसेच घरातील इतरांनाही द्यावे.

|| श्रीगणेशाय नम: ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||

ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||

कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||

पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती ||

शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा

प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||

दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती

म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली

महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता

अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||

सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||

शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||

चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||

पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४

हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||

करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||

निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||

पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||

पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||

प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ ||

नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||

हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||

मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||

सर्व स्वामी भक्तानो,

* सुस्वागतम *

!! श्री स्वामी समर्थ !!

स्वामी जयंतीच्या सर्व स्वामी भक्ताना हार्दिक शुभेच्या . स्वामी दर्शन मराठी ब्लॉग मधे सर्व स्वामी भक्तांचे स्वागत. स्वामिंच्या कृपने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने अणि सर्वांच्या वेळोवेळी केलेल्या मौलिक सुचनामुले स्वामीदर्शन यशस्वी वाटचाल करीत आहे . श्री स्वामी समर्थ कृपने व स्वामी जयंतीच्या च्या निमिताने स्वामीदर्शन परिवार सर्व स्वामी भक्ता साठी सुरु करत आहे मराठी “स्वामीदर्शन” ब्लॉग. सर्वानी न चुकता विसिट करा https://swamidarshan.wordpress.com/

…तरी इच्छुक स्वामी भक्तानी आपले लेख,आपले अनुभव,स्वामींची कविता,व इतर अध्यात्मिक लेख आपल्या नावासहित खालील ईमेल वर पाठवावे .

 EMAIL- mahiti@swamidarshan.com या स्वामी सेवेत आपन सर्व स्वामी भक्तानी भाग घ्यावा ही स्वामीदर्शनची इच्छा ….!!!! http://www.facebook.com/swamidarshan

WWW.SWAMIDARSHAN.COM