Category: स्वामींच्या लीला


“स्वामी लीला”
एके दिवशी गणपतीचे मंदिरात पलंगावर श्रीँची स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनास आले. त्यांत एक व्यापाऱ्‍यास ते रागारागानेँ म्हणाले,
“क्योँ जी, हमारा डालिँब ला दो..!”
असे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला, ‘महाराज, जी आपणांस एका कामात नवस केला होता. त्याप्रमाणे माझे काम झाले’ म्हणून एका रुपयाची दोन डाळिँबे आणली; परंतु ती पाकिटांत विसरुन गेलो. क्षमा करावी. लगेच त्याने मनुष्य पाठवून ती डाळिँबे महाराजांचे पुढ्यात ठेवली.

“स्वामीलीला” एकवेळ एका ब्राम्हणाकडे जाऊन महाराजांनी खाण्यास दशमी मागितली. ब्राम्हणाने सांगितले ‘महाराज, दारात गाय आहे, पण ती दुध देत नाही.’ हे शब्द ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठिवर हात फिरवून म्हणाले ‘बाई, हा ब्राम्हण कुटुंबवत्सल आहे. याजवर तुम्ही अवकृपा का करिता? यास दुध देत जा.’ असे गाईजवळ बोलून ब्राम्हणास सांगितले. ‘आज तू हिचे दुध काढुन मला दशमी करुन ठेव, मी संध्याकाळी येईन.’ त्या ब्राम्हणाने महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दुध काढायला घेतले आणि काय आश्चर्य! गाईने भरभरुन दुध दिले. त्या ब्राम्हणाने दुधाची दशमी करुन ठेवली. महाराजांनी संध्याकाळी येऊन ती खाल्ली. ॥श्री स्वामी समर्थ॥

shri swami samath

गोपाळपंत केळकर नावाचे स्वामींचे एक भक्त होते. ते पूर्वी पोटाच्या विकाराने आजारी असत. त्यांना मरणप्राय यातना होत. एक दिवस त्यांना असे वाटले कि, जो कोणी ह्या जगताचा ईश्वर असेल त्यांने जर मला बरे केले तर पुन्हा एका भगवंतावाचून कोणाचीही चाकरी करणार नाही. असा निश्चय करताच मग काय उशीर? ८ दिवसातच त्यांची व अक्कलकोट स्वामींची भेट झाली. व ते व्याधी मुक्त झाले. आणि ठरल्या प्रमाणे ते स्वामींच्या सेवेत रुजू झाले.
एकदा स्वामींचा मुक्काम हाचनाळ गावी पडला. सोबत शेपन्नास सेवेकरी होते,त्यात हे पंतही होते.दुसऱ्याच दिवशी पहाटे गोपाळपंत स्नानासाठी विहिरीवर गेले. गावात विहीर एकाच, त्यात पंतांकडे स्नानाचे भांडे नव्हते, ना गावात कोणाशी ओळख-पाळख. विहिरीवर काही ब्राम्हण व थोडे शुद्र होते. प्रथम पंतांनी ब्राह्मणानकडे भांडे देण्याची विनंती केली, पण त्यांना कोणीच दाद देईना, मग पंतांनी एका शुद्र कडून घागर घेवून स्नान आटोपले. ते पाहून काही सेवेकाऱ्यांनी त्यांची निंदा सुरु केली. त्यांतच एक बळवंतराव नावाचा स्वामींचा सेवक होता. त्याने तर- ‘ अरे हा कोकण्या बाटला, ह्याच्या हातचे पाणी ही पिऊ नका.’ असे सांगण्यास सुरुवात केली. ते ऐकून पंतांना रडू कोसळले. नंतर काही मंडळी म्हणाली-‘ ही गोष्ट न समजून घडल्याने आता त्यांना महाराजांचे तीर्थ द्या म्हणजे झाले.’ मग श्रीपाद भटाने पंतांना तीर्थ देवून शुद्ध करून घेतले. असो.
परंतु दुपारी जेवणाच्या पंगतीत पंतांचा परत अपमान झाला. काही मंडळींनी पंतांच्या बरोबर भोजन करण्यास आक्षेप घेतला. बळवंतराव ने तर पंतांचे पान पंगती बाहेरच ओढून ठेवले व ‘ जा तिकडे बैस. पंगतीत नको’ असे सांगितले. गोपाळपंत मनातून फार दुखी झाले. वारंवार मनातून दुखाचे काढ येवू लागले, पण आपला कैवारी कोण? इकडे त्यांचे जेवण रडत चालले होते आणि तिकडे स्वामींसाठी वाढलेल्या पानावर स्वामी बसलेच नाहीत. उलट ताट पाहताच शिव्या देवू लागले. ‘ आम्ही बाटलो, आम्हास शिवू नका. आम्ही जेवत नाही.’ असे म्हणत नरसिंह अवतार धारण केला, लोक विनंत्या करतच राहिले, परंतु कोणाचे काही चालेना. असे सायंकाळ पर्यंत चालले. मग थोडे शांत झाले. त्यावेळी पंतांना ,’माझा कोणी कैवारी नाही ‘ असे वाटले होते त्यावर ही कृती स्वामींनी दाखवली. दुसरे दिवशी गोपाळापंतांना पंगतीत योग्य मान मिळाला.

तात्पर्य- मनुष्याने उपेक्षा केली तरी ईश्वर मात्र कधीही उपेक्षा करत नाही.

श्री स्वामी समर्थ
महाराज एकदा आनंद वृत्तीने एका मंदिराजवळ बसलेले असताना
मंदिरात पुजारी आरतीची तयारी करत होता
तेवढ्यात एक उंदीर देवघराजवळ इकडून तिकडे फिरताना
बघून पुजारी त्याला जवळील चंदनाच्या लाकडाने मारतो
तत्क्षणी त्याचा प्राण जातो
त्या उन्दिराला पकडून बाहेर फेकून येताना महाराज त्याला म्हणतात
” त्या उन्दिराला माझ्या जवळ घेऊन ये , तो पुन्हा देवघरात नाही जाणार ”
जवळील सर्व लोक महाराजांना तो उंदीर मेला आहे हे सांगतात
महाराज त्या उन्दिराला पकडून म्हणतात ” उठ आता आणि जा तुझ्या जागेवर ”
पुन्हा मंदिरात येऊ नकोस असे म्हणताच तो उंदीर बिलाजवळ जावून थांबतो
सर्व जन आश्चर्य चकित होतात
महाराजांचे माणसा प्रमाणे प्राणी मात्रांवर हि खूप प्रेम होते
ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

“एकदा स्वामी आनंदात असताना एका झाडाखाली बसले होते तिथे बऱ्याच जनांची गर्दी जमली होती सगलेच नैवद्य घेउन स्वामींची षोडशोपचारे पूजा करावी आनी आशीर्वाद घ्यावा या भावनेने पुढे उभे होते एक गरीब स्त्री सगळ्यात माघे होती जनांची गर्दी पाहून आज आपल्याकडून नैवद्य अर्पण होणार नाहि ही चिंता करू लागली काहि तास उभी राहून शेवटी कंतालूं एका झाड़ा खली जून बसली आनी महाराज्याना विनवणी करू लागली महाराज कृपा करा काहि चुकले असेल तर क्षमा करावी पण नैवद्य स्वीकार करावा असे म्हणून डोळे बंद करून नामस्मरण करू लागली तेवढ्यात महाराज सेवेकर्याना म्हणाले ” त्या स्त्रीला नैवद्य घेउन बोलवा , तिच्याकडे कसे लक्ष नाहि जाणार ? लवकर बोलवा आज आम्ही तेच नैवद्य घेऊ ” असे म्हणून सेवेकारी त्या स्त्रीला घेउन आले महाराजानी नैवद्य स्वीकारले आनी जवालील एक नाराल तिच्या पदरात ठेवले आनी म्हणाले ” तुझ्या घरी एक सुन्दर मुलगा जन्माला येइल,तुझे सर्व दारिद्र्य नष्ट होइल , चिंता करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ” महाराजांचे वाकया ऐकून स्त्रीला फार आनंद झाला जेवढी आजपर्यंत सेवा केलि त्याचा फल भेटला म्हणून खुश होती तिने महाराजना कोंतिच विनंती,चिंता म्हणून नव्हती दाखवली महाराजानी आपल्या मनातला सगळा काहि ओलाख्ला म्हणून आनंदात घरी येउन आपल्या पतीला सांगू लागली दोघे मिळून अधिक सेवा करू लागले थोड्याच दिवसात पतीला चांगली नोकरी भेटली आनी त्याच वर्षी तिला सुन्दर असा पुत्र झाला महाराजांची लीला अगाध आहे “

“श्री स्वामी समर्थ “

——————————————————————————————————————————————————–

 

|| श्री स्वामी समर्थ ||

” स्वामी   समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रुपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते. द्वारकापुरीत त्या वेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहात होते. हे सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला  हाक मारली. म्हणाले, ”तू ज्याच्या नावाने हाका मारीत आहेस तो मी, बघ इथ तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा.” इतक बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुणरूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, ”मला दिव्यदृष्टी दिलीत. आता मला जन्ममरणाच्या या तापापासून मुक्त करा!” स्वामी समर्थांनी सूरदासाला ”तू ब्रह्मज्ञानी होशील!” असा आशीर्वाद दिला.

——————————————————–

|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

!! श्री स्वामी समर्थ !!

“अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकर्यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकर्यांस म्हणाले, ”अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बर. त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !” सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहिशी झाली.

——————————————

http://www.facebook.com/Swamidarshan

” एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवर बसून आले होते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले, ”तुझे मोठेपण तुझ्या घरात. ते येथे कशाला पाहिजे? आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो.” तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत. 

——————————————————————-

     अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ”तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.” तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ”मला अजून आपली सेवा करावयाची आहे!” तात्या भोसले यांनी त्या यमदूताला  पाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ”हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा !” त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

 

अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ”तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.” तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ”मला अजून आपली सेवा करावयाची आहे!” तात्या भोसले यांनी त्या यमदूताला  पाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ”हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा !” त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

सर्व स्वामी भक्तानो,
                 
 !! श्री स्वामी समर्थ !!
गुरु पोर्णिमेच्या सर्व स्वामी भक्ताना हार्दिक शुभेच्या .
स्वामी दर्शन मराठी ब्लॉग मधे सर्व स्वामी भक्तांचे स्वागत.
स्वामिंच्या कृपने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने अणि सर्वांच्या वेळोवेळी केलेल्या मौलिक सुचनामुले स्वामीदर्शन  यशस्वी वाटचाल करीत आहे .
श्री स्वामी समर्थ कृपने व गुरु पोर्णिमा च्या निमिताने स्वामीदर्शन परिवार सर्व स्वामी भक्ता साठी सुरु करत आहे मराठी “स्वामीदर्शन” ब्लॉग.
सर्वानी न चुकता विसिट करा

तरी इच्छुक स्वामी भक्तानी आपले लेख,आपले अनुभव,स्वामींची कविता,व इतर अध्यात्मिक लेख आपल्या नावासहित खालील ईमेल वर पाठवावे .

   EMAIL- mahiti@swamidarshan.com

या स्वामी सेवेत आपन सर्व स्वामी भक्तानी भाग घ्यावा ही स्वामीदर्शनची इच्छा ….!!!!
www.facebook.com/swamidars​han

WWW.SWAMIDARSHAN.COM