Category: !! श्री स्वामी समर्थ !!
स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुका.
या आत्मलिंग पादुका स्वामी समर्थांनी स्वामीसुत – हरिभाउ फडके यांना दिल्या होत्या .
सुरुवातीला या पादुका कामाठीपुरा येथील स्वामींच्या मठात होत्या
परंतू , सध्या या पादुका चेंबूर येथील मठात आहेत..
या पादुका देताना स्वामींनी स्वमिसुतांना सांगितले होते कि , ” दिलेल्या आत्मलिंगाची नीट व्यवस्था करावी…. बंदर किनार्यावर जाउन भाक्तीसाम्प्रदायाची ध्वजा उभी करावी.
———————————————————————————————————————–
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा॥धृ॥ छेली खेडेग्रामी तू अवतरलासी। जगउध्दारासाठी राया तू फिरसी ॥ भक्तवत्सला खरा,तू एक होसी।
म्हणूनी शरण आलो,तुझे चरणाशी॥ जय॥१॥
त्रैगुण परब्रम्ह,तुझा अवतार।
त्याची काय वर्णू,लीला परामर॥ शेषादिक शिणले ,न लगे त्या पार।
जेथे जडमूढ कैसा ,करु मी विस्तार ॥जय॥२॥
देवादि देवा, तू स्वामीराया। निर्जर मुनिजन ध्यातो,भावे तंव पाया।
तुजसि अर्पण केली, आपुली ही काया॥ शरणागता तारी तू स्वामीराया ॥जय॥३॥
अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले। किर्ती ऐकूनी कानी,चरणी मी लोळे॥ चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले।
तुझ्या सुता न लगे,चरणा वेगळे ॥४॥
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ
———————————————————————————————————————————————–
“स्वामीना तूळस, भगव्या रंगाची फुले आवडत असे स्वामी सूत सांगतात ;ते एके ठिकाणी म्हणतात ::
” परी हो स्वामीसी आवडे भगवे फूल !
भगव्या फुलाची माळ ती सगुन !करोनिया तुम्ही चरणी अर्पा !!
———————————————-
श्री स्वामी समर्थाना खाण्याच्या पदार्थात “बेसनाचे लाडू “,”पूरण पोळी” ,कड्बोळी व “कांद्याची भजी” त्याना विशेष अ!वडत असे.
स्वामी कुत्रा, गायीवर खुप प्रेम करत असत…!!
———————
!! श्री स्वामी समर्थ !!
“दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय.
अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इ.स. १८५६ मधे प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचे कार्य केले. ”जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,” असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले.
स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.
अशाप्रकारे स्वामींनी मंगळवेढे येथील बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले. त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले. हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले. संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक, पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात ते दुसर्यांना सुखाने सुखावणारे असतात.
स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सत विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी समर्थ अतिशय तेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत.
——————————————————
नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी|
यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यति ||४||
कधी जाई हिमाचली| कधी गिरी अरवली|
कधी नर्मदेच्या काठी| कधी वसे भीमा तटी ||५||
काली माता बोले संगे| बोले कान्याकुमारीही|
अन्नपूर्णा ज्याच्या हाती| दत्तगुरू एक मुखी ||६||
भारताच्या कानोकानी| गेला स्वये चिंतामणी|
सुखी व्हावे सारे जन| तेथे धावे जनार्दन ||७||
प्रज्ञापुरी स्थिर झाला| मध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत ||८||
“सर्व संकटावर मात करणारी एक शक्ति || श्री स्वामी समर्थ || मंत्र.”
॥ श्री स्वामी समर्थ ॥ हा षडाक्षरी मंत्र असून सर्वात शक्तिशाली मंत्र आहे.प्रत्येकाने या मंत्राचा जप रोज किमान १५ मिनिटे तरी करावा.याला वयाची अट नाही लहानांपासून तर वृध्दांपर्…यंत प्रत्येकाने मनोभावे केल्यास त्याचे अनेक फायदे व अनुभव येतात.सर्व दुःख निवारून ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात व त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा संकट येत नाही. श्री स्वामींवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा…“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” या त्यांच्या आधारवडाची प्रचीती भक्तांना आजही येतेच.
————————————————————————————————————————————————–
http://www.swamidarshan.com http://www.facebook.com/Swamidarshan
**श्री स्वामी समर्थ तारक मंत्र **
नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई त्याला।
परलोकीही ना भिती तयाला॥२॥
उगाची भितोसी भय हे पळु दे।
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे।
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥
खरा होई जागा श्रद्धेसहीत।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात।
नको डगमगु स्वामी देतील साथ॥४॥
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती॥5॥
**॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**