Category: भक्तांचे अनुभव


“मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ” ही म्हण तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना . ज्यांना परमेश्वराला shortcut  मध्ये आणिbypass way ने भेटायचं आहे आणि असत .माझ्या बोलण्याचा रोष हा “आस्तिक -नास्तिक” ह्या मुद्यावर नाहीच. परमेश्वराला मानन आणि त्याची भक्ती करण हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे . मला फक्त इथे माझा अनुभव सांगावसा वाटला आणि तो ही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला. 
बदलापूरची ” स्वामी समर्थवाडी” म्हंटल कि माझं मन हे एकदम “आनंदी आनंद गडे” होत असत . कारण समर्थवाडीच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे  . तिथे आदिदतात्रय , तसेच दत्गुरुंचे १६ अवतार,स्वामी समर्थ  ,रेणुका देवी , मारुती मंदिर , दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अश्या तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते .तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळीना सोवळ आणि स्त्रियांना साडी आणि अघोळ करुन देवाची म्हणजे देवांच्या मूर्तींची  स्व हस्ताने पूजा करणे (दत्तगुरू आणि मारुती ह्यां मूर्त्यांना  स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम ). तसचं इथे १५० गाई , ५ श्वान , दोन बलदंड हत्ती , इमू , आणि बदके हे हि वाडीच एक वैशिष्टच आहे.  
ह्या गुरूपुर्णीमेला मला हा सुंदर अनुभव अला तो असा कि, ह्या गुरुपोर्निमित मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाडीत गेले होते आणि ह्या वेळी स्वामीसखाचे म्हणजेच गुरूंचे पाद्द पूजन पण करायचे होते ते ही रात्री १०. ३० ला. जवळ जवळ ५०० लोकं त्यावेळी तिथे हजर होते पाद्द पूजनासाठी .सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसच मलाही उपासना आणि सेवा दिली गेली. दत्त मंदिर , गुरुपंच्यातन मंदिर झाडूनपुसून clean करणे. आणखी एक गोष्ट ती ही कि प्रामुख्याने  तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात . 
त्यावेळी माझ्या बरोबर आई किवां कोणीही घरातले असे नव्हतेच .दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती , सेवेनंतर पद ,आरत्या ,जपमाळा , पालखी अश्या उपासना सुद्धा चालू होत्या.वाडीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत .सतत तोंड न चालवणे म्हणजे खात बसू नये ,बडबड ,गप्पा-ठप्पा नाहीत. आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष्य ठेवायचं. 
स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्द पूजन हे दत्त मंदिरात होणार होत.  पण भक्तगण एवढे वाढले होते कि तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना. सरळ ते गुरुपंच्यातनमध्ये जावून बसले . एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे धोधो पाऊस हा चालूच होता . आजूबाजूला रान जंगल असाव अशी गर्द  झाडी. पायाखाली वाटेत काय यॆइल त्याचा बेत नाही नेम नाही . प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते . आणि जस ज्यांना समजल कि पूजा हि दत्त मंडपात नाही आहे तसं जो तो गुरूंच्या दर्शनाला गुरु पंच्यातन मध्ये गेला. संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला. आणि मी आपली एकटीच तिथे ४ / ५ स्त्रियान सोबत गुरु येतील अशी वाट बघत होते. आयत्या वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मलातर कल्पना अलीची नाही. मग तिथेच एक काका होते त्यांनीच मला विचारलं “तू इथे काय करतेस?? तुला गुरुंच पूजन करायचं आहे ना ?? मग तिथे गुरुपंच्यातन मध्ये जा . तिथे तो कार्यक्रम चालू आहे.” हे काकाचं बोलण एकून मी खूपच घाबरून गेले होते .कारण ते ह्यासाठी कि , एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका   battery च्या प्रकाशावर काळोखातून जायचं होत आणि आजूबाजूला किवां वाटेत काही साप वगेरे आला तर ?ह्या भीतीने मला अक्षरशा आईचीच आठवण आली होती. स्वामिना हाक मारली , आता तुम्हीच सोबत चला ह्या भयाण अंधारात आणि मी  कशीतरी त्या काळोखातून वाट काढत गेले . धो धो पाऊस चालू होता तो वेगळाच.पोहचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं  तर बाप्परे केवढी गर्दी लोकांची !!म्हंटल आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार . त्यात जवळ जवळ ५०० लोकं भर पावसात उभी होती . त्या गर्दीत उभ राहणार. तेवढ्यातच एक काकी एकदम बोल्या तू इथून ये. त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्या वेळी ते  खूप नवल वाटलं आणि अवाक वहायला झाल कि तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोकं उभी होती , लहान मुलानबाळासोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता, गर्दीत उभी न राहता मला २ मिनिटांनमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजा हि गुरूंची करायला मिळणार होती.  
(वाडीत गर्द अंधार आहे कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अश्या ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळू हळू पुढे सुख सुविधा होतील . केल्या जातील, आणि होतही आहेत. तसे दिवे आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत . ) 
 
मला एवढंच सांगावस वाट्त कि आपण एकट जरी कुठे असलो , तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात . त्यांना बरोबर कळत असत आपला भक्त काय करतो आहे. त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून , आवडीने करतो आहे आणि मग ते (आपला देव / स्वामी समर्थ ) आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर , सोयीस्कर करत असतात, करत जातात . म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली कि बरोबर भक्ती साध्य होते आणि अपोआप मग परमेश्वरावरचा विश्वास साध्य होतो . श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ 
Ms. Suchitra J Ayare
Worli , Mumbai 18 ..

we always feel that swami with us

my son Dhiraj Deepak Petare working in Raymond Ltd.as a telephone operator for 4 years,he working as a temporary worker

many time we request for permanent but there is no any vacant post for telephone operator & some old workers in this company till today

working as temporary from many years.so we lose our hopes because many candidate ready for this post.his senior officer point out

that he have no any chance to permanent for this post but my son always goes in ayodhyanager kendra for seva.And in April 2011

surprising he got letter that he become a permanent employee from May 2011 actually there is no any post but company specially taken

decision to make him permonent  only because they like his sinsiarity & honest work.this is only happen because of swamikrupa

माझ नाव अमोल दत्तात्रय परब ,मुंबई माझ्या जीवनात जेवडे अनुभव आले तेवडे कमीच आहे पुन त्यात आलेला एक अनुभव मी सांगतो काही महिन्यानपूर्वी मी खूप आजारी होतो मला kidney stone चा प्रोब्लेम झाला होता आणि त्यात्रासामुळे मला कामावर जाने अशक्य झाले होते dr ने मला operation करण्यास सांगितले होते पुन माझी त्यासाटी तयारी  नवती मी घाबरत होतो पुन सतत स्वामिना साकडे घालून नामस्मरण करत होतो प्रचंड वेदनांनी मी त्रासलो होतो आणि त्यात मी नोकरी हि गमवून बसलो होतो पुन एकेदिवशी एका मित्राकडून मला नोकरीसती बोलवण्यात आले मी तिते जातानाही मला खूप वेदना झाल्या नंतर interview दिला आणि मला नोकरी मिळाली appoinment letter गेऊन घरी येतानाही कूप त्रास झाला पुन स्वामीच्या कृपेने मला नोकरीही मिळाली होती आणि १५ दिवसांनी मला  कामावर रुजू व्यायचे होते त्यासाटी मी operation करण्याचा निर्णय घेतला म्हणून सोनोग्राफी करण्यास गेलो तेव्हा माझी १५ दिवसांनी सोन्ग्रफी करणारा dr आचर्य चकित झाला कारण माझा stone माझ्या पोटातच नव्हता हा माझ्या जीवनात आलेला अनुभव

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

|| श्री स्वामी समर्थ ||

मला तुमच्याशी एक आत्ताच आलेला अनुभव शेअर करायचा आहे. माझे पती सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि त्यांना कळले कि त्यांचे पाकीट सापडत नाही आहे. बराच वेळ आम्ही दोघे शोधात होतो. काळजी वाटत होती कारण त्यामध्ये क्रेडीट कार्ड्स, पेन कार्ड सारखी महत्वाची डॉकुमेंत्स होती.

मी स्वामींकडे प्रार्थना केली कि ५ मिनिटांच्या आत आम्हाला पाकीट सापडू दे, आणि चमत्कार झाला. पाकीट जिकडे असेल असे वाटलेच नाही तिथे आम्ही शोधायला गेलो आणि ते सापडले. पाहायला हि खूप लहान गोष्ट वाटेल पण ज्या वेळी आपण एखादी वस्तू निकराने शोधात असतो पण सापडत नाही आणि अगदी हेल्पलेस झाल्यासारखे वाटते तेव्हां स्वामीची माया कळते .

स्वामींची कृपा अशीच आमच्यावर आणि सर्वांवर राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

मला माझा हा अनुभव स्वामिभाक्तांबरोबर शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

|| श्री स्वामी समर्थ ||

संतोषी पेडणेकर
एक स्वामी भक्त