Category: आरोग्य आणि अध्यात्म


श्री स्वामी समर्थ……..
एक मुसलमान वयस्कर स्त्री घरी बनवलेले दही विकुन आपला चरितार्थ चालवत असे. तिने बनवलेल्या गोड दह्याला बरीच मागणी होती. अश्याप्रकारे ती वयस्कर बाई आपला आयुष्य कंठीत होती .तिने स्वामींचे नाव ऐकले होते पण कधी प्रत्यक्ष दर्शन घेतले नव्हते. दही बनवताना शांतपणे नामस्मरण करणे एवढीच तिची भक्ती मर्यादित होती.एक दिवस तिला सगळ्यांना एवढे आवडणारे दही, स्वामींना आपल्या हाताने भरवण्याची तीव्र इच्छा झाली. झालं!! एक दिवस ती बाई पहाटे लवकर उठून, घरी लावलेलं दही घेऊन अक्कलकोटच्या मार्गावर चालू लागली.तिला दुपारच्या आत अक्कलकोटला पोचायचे होते. कारण सुर्य डोक्यावर आल्यावर झालेले आंबट दही स्वामींना कसे द्यायचे? हा प्रश्न तिला भेडसावत होता. भरभर पाउलं टाकत ती बाई अक्कलकोटच्या मार्गाने चालत होती.दिवस वर येऊ लागला तस उन वाढू लागले. त्या वयस्कर बाईची दमछाक होऊ लागली. तरीही नेटाने ती बाई जोरात चालतच राहिली. बघता बघता माध्यान्य झाली. सूर्य डोक्यावर आला.उन्हाळ्याचे दिवस होते. बाईच्या तोंडाला कोरड पडली. पाउल पुढे टाकवेना. जीव कासावीस झाला. तरीही ती बाई नामस्मरण करत वाट तुडवतच राहिली. एक वेळ आली की बाईला पाउल पुढे टाकवेना. तिचा प्राण कंठाशी आला. दमून ती बाई एका झाडाच्या सावलीत बसली. डोक्यावरचे दह्याचे मडके तिने आपल्या समोर ठेवले. त्या मडक्याकडे बघून त्या बाईच्या डोळ्यात पाणी आले.माझ्या स्वामींना मी दही भरवू शकत नाही. संध्याकाळपर्यंत दही आंबट झाले कि ते त्यांना आवडणार नाही. या कल्पनेने ती व्याकूळ झाली. तिचा जीव कळवळला. स्वामींच्या नामस्मरणाखेरीज दुसरा पर्याय तिच्याकडे उरला नव्हता. गरीब बिचारी ती अगतिक म्हातारी झाडाखाली बसून स्वामीचा जप करू लागली. डोळ्यातून अश्रू यायचे थांबत नव्हते.इकडे त्या दिवशी स्वामींना राजवाडयात जेवायचे आमंत्रण होते. जय्यत तयारी मालोजीराजांनी केली होती. भव्य पंगत, नाना पक्वाने, सगळा राजेशाही थाट होता. तयारी सगळी झाली होती. अवघी सभा स्वामींची प्रतीक्षा करत होती.ठरल्यावेळी स्वामी आले. मालोजीराज्यानी त्यांना स्वतः पाटावर बसवले, पूजा केली. चरण धुतले. आता सुरवात करायची. स्वामीनी पहिला घास घेतला कि सभा पण जेवायला मोकळी.स्वामीनी पहिला घास घेतला मात्र तोंडाकडे आणून ते थबकले,त्यांची समाधीच लागली. सभेला काही कळेना.सगळेजण तर्कवितर्क काढू लागले. मालोजीराज्याना वाटले जेवण अळणी आहे, किंवा काहीतरी चुकले आहे. त्यांनी तशी स्वामींना विचारणा केली. पण स्वामी काही बोलेचनात.इकडे या बाईसमोर स्वामी प्रकट झाले आणी म्हणाले “आई जेवायला बसलो ग! पण दहीच नाही बघ. तुझ्याकडे आहे ना,भरव मला” ती म्हातारी खूप आनंदीत झाली. पटापट तिने मडके उघडून स्वामींना दही भरवले. दही भरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. स्वामी दही खातखात ते अश्रू पुसत होते. झाले! दही खाऊन स्वामी निघून गेले. या म्हाताऱ्या बाई चे समाधान झाले.इकडे पंगतीमध्ये जरावेळाने स्वामीनी पहिला घास घेतला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.मालोजीराज्याना स्वामी म्हणाले, “मालोज्या, गोड दह्याशिवाय जेवणात मजा नाही बघ”. सगळ्यांना आश्चर्य वाटले कारण त्या दिवशी जेवणात दहीच नव्हते. कोणालाच काही कळेना.संध्याकाळी ती म्हातारी बाई अक्कलकोटला पोहचल्यावर सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.
श्री स्वामी समर्थ.
_———- दिलीप आळशी

स्वामी फार तापट होते असा बोध एकंदरीत उपलब्ध असलेल्या समकालीन लिखाणावरून होतो. पण मला असे वाटत नाही. माझी आई, माझ्या लहानपणी रागावली की मला “मेल्या मर ” असे म्हणायची. ह्याचा अर्थ तिची तशी इच्छा होती असा होतो का? मुळीच नाही.

गोविंद बल्लाळ मुळेकर हे मुंबईकर आणि स्वामींचे परमभक्त. आपल्या कुवतीप्रमाणे यथासांग स्वामींची सेवा करणारे मुंबईचे ख्यातनाम दैवेज्ञ ब्राह्मण. स्वामीही त्यांना “माझा गोविंदा” असे म्हणत असत.

तर ! हे मुळेकर एकदा स्वमिदर्शनप्रित्यर्थ अक्कलकोटला आले होते. तिन्हीसांजेच्या वेळी त्यांना एका विषारी सापाने डसले.गावात डॉक्टर नाही. औषध उपचाराची योग्य सोय नाही. दळणवळण नाही. अश्यात अंगात विष भिनत चालेले. अंग हळूहळू काळेनिळे पडायला लागले. त्यांच्या तोंडाला फेस आला आणि मुळेकर समजले की आपला शेवटचा क्षण आता जवळ आहे. त्यांनी गावकर्यांना सांगितले “मला माझे शेवटचे क्षण माझ्या समर्थाबरोबर घालवायचे आहेत. मला वटवृक्षाखाली घेऊन चला” गावकर्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना घेऊन मठात आले.

मुळेकराना आणणारे गावकरी मठाची पायरी चढले आणि स्वामीनी रुद्रावतार धारण केला. शिवीगाळ, आरडओरडा, थयथयाट करत स्वामी ओरडले ” बामन्या ! अजून एकही पायरी चढलास तर माझ्याशी गाठ आहे !! असे म्हणत स्वामीनी आपल्या पायातील पादुका फेकून मुळेकरावर भिरकावल्या. त्या पादुका डोक्याला लागून मुळेकराना जखम झाली आणि भळभळा रक्त वाहू लागले. मुळेकराच्या तोंडचे पाणीच पळाले. शेवटच्या क्षणी मला माझा भगवंत शरण देत नाही ह्या कल्पनेने ते फार दुःखी झाले.

मठाच्या बाहेरच आपण आपले प्राण त्यागावे असे त्यांनी ठरवले. आणि गावकर्यांना तसे सांगितले.थोडयावेळाने मुळेकराचे विष आपसूक उतरले आणि स्वामीही शांत झाले.

स्वामी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि “माझ्या गोविंदा” करत त्यांना मिठी मारली. आणि म्हणाले “गोविन्द्या अरे! मी तुझ्याशी नाही तुला चढत असलेल्या विषाशी बोलत होतो”

मुळेकराच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. स्वामी ते आपल्या हातानी पुसत होते .

।।श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ।। – दिलीप आलशी .

‎||”अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तसदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”||
||श्री स्वामी समर्थाय नम:|| सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”

दत्त ऊर्फ दत्तात्रेय हा हिंदू धर्मातील एक देव व योगी आहे. हा अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत

[१]. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मा

नले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले
[२].दत्ताचा उल्लेख त्याचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, आणि महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे बंधू, ही दत्ताचे नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत.

दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते.सगुण प्रतीके उपलब्ध असलीतरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत पण उत्तरकाळातील दत्तभक्ती संप्रदयांनी जातिव्यवस्था बळकट होऊ देण्यास हातभार लावल्याचेही आढळून येते.

गुरुचरित्र हा दत्ताचे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांच्या बद्दलचा चरित्र ग्रंथ आहे गुरूचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे मुळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही सध्या उपलब्ध श्रीगुरूचरित्राची मराठी भाषेतील रचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी आणि रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असु शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे

सरस्वती गंगाधर हे नरसिंह सरस्वतीचे एक शिष्य सयंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.

ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.

मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे.”

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे

सर्वतीर्थे दावी , सदगुरुराय माझा !!

गुरु सुखांचे आगर, गुरु भाग्य दाता

ज्ञानियांचा राजा, गुरुराज माझा !!

सेविता दु:खिता, ठेवा ऐहिकाचा

सदैव पाठीशी तो, स्वामीनाथ माझा !!

चैतन्याचा स्त्रोत, ते अद्वैत स्वरुप

मुर्तीमंत कैवल्य, प्रभुराय माझा !!

आता पश्चाताप, सारी उतरली भूल

आशिर्वादे ठेवील, वटवृक्ष माझा !!

तोचि सगुण, तोची निर्गुण, स्वयं परब्रम्ह

स्वामी समर्थ माझे,अक्कलकोटी राणा !!

श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय !

सस्नेह,

विशाल कुलकर्णी

 १. कांदेवाडी {गिरगाव } २.श्री महालक्ष्मी मंदिरा जवळ { महालक्ष्मी } ३. परळ एस.टी बस डेपोजवळ {परळ } ४. सेना भवनजवळ {दादर , पश्चिम } ५. हनुमान रोड , {विले पार्ले , पूर्व } ६. लोखंडवाल कॉ म्प्लेक्सं {अंधेरी , पश्चिम} ७. कांदिवली व्हालेज {कांदिवली , पश्चिम} ८. जैन मंदिरा जवळ शांतीबाग {चेंबूर , पूर्व } ९. मुलुंड {पूर्व } १०. चेंदणी कोळीवाडा {ठाणे } ११.डोंबिवली {पूर्व , पश्चिम} हे आहेत मुंबई मधील काही प्रमुख मठाचे पत्ते जय जय स्वामी समर्थ चला मग येताना स्वामीच्या दर्शनाला…..!!! ८. हा मठ चेंबूर नाक्याला आहे. जैन मंदिराच्या बाजूला म्हणा किवा मागे म्हणा. जैन मंदिराच्या एकदम बाजूला आहे मठ. ज्यांनी ज्यांनी श्री स्वामी समर्थ बखर वाचली असेल त्यांनी १६४ पणा वरील ” स्वामी सुतांची गोष्ट ” हा लेख जरूर पुन्हा वाचा. स्वामी सुतना व्यापारात नफा झाला तेव्हा स्वामी सुतानी स्वामिना नवस केला. या नफ्यातून चा त्यांनी स्वामीनसाठी चांदीच्या पादुका बनवल्या. आणि त्या स्वामीन पुठे ठेवल्या स्वामीन त्या १४ दिवस सतत पायात घालून ठेवल्या. स्वामी सतत म्हणत कि हे मज आत्मालिंग आहे मी कोणालाच देणार नाही. चांदीच्या पादुका आपणास मिळाव्या यासाठी बर्याच सेवेकर्यांनी प्रयत्न केले पण स्वामीनी त्या त्यांना नाही दिल्या. श्री स्वामी समर्थ महाराजांनी १४ व्या दिवशी स्वामी सुताना दिल्या. त्याच त्या पादुका या चेंबूर च्या मठात आहेत. तर सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा.

१. कांदे वाडी{गिरगाव}हा मठात जाण्यासाठी . चरणी रोड स्टेशनला उतरायच आणि पश्चिमला यायच आणि ओपेरा हौसे विचारायच किवा कांदे वाडी विचारायच स्टेशन पासून हा मठ १० -१५ मिनिटाच्या अंतरवर आहे. गाय वाडी समोर कांदे वाडीची गल्ली आहे . हा मठ ज्या भागात आहे त्या भागाला ओपेरा हौसे म्हणतात . पण कांदे वाडी विचारलात तर उत्तम होईल. हा मठ खूप जुना आहे अस म्हणतात.

२. महालक्ष्मिचा मठ हा एक इमारतीच्या आत मध्ये आहे. महालक्ष्मि मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला जावे { महालक्ष्मि मंदिरातून बाहेर येताना उजवी बाजू , किवा मंदिराच्या आत जाताना डावी बाजूला वळावे } असे म्हणतात कि स्वामी त्या काळात मुंबईला आले असताना त्या ठिकाणी राहायला होते. स्वामी ज्या भक्त कडे राहिले होते त्यांना स्वामीनी आपल्या आत्म लिंग पादुका दिल्या आहेत. दर गुरुवारी त्या सकाळी १० : ०० च्या आसपास अभिषेक करताना आपण उघड्या पाहू शकतो. एरवी त्या एक काचेच्या पेटीत बंद असतात. दर गुरुवारी हा माठ पूर्ण दिवस उघडा असतो.

————————————————————————————————————————————————

३. परळचा मठ हा S.T डेपोच्या बरोबर मागच्या गल्ली मध्ये आहे. एलपीस्टन स्टेशन पासून जवळ आहे परळ S .T . डेपो.

———————————————————————————————————————————————–

४. दादरचा मठ तर सगळ्या स्वामी भक्तांना माहितीच आहे. दादर सेना भवनच्या बाजूच्या १ गल्ली मध्ये { सेना भवनच्या डाव्या बाजूला }

———————————————————————————————————————————————–

५. विले पार्ल्यचा माथा हा हनुमान रोडला आहे. विले पार्ले {E} ला यायच स्टेशन वरून २,३३९,३९,३५,३२२, या बस पकडायच्या. स्टोपच नाव हनुमान रोड किवा गाजली हॉटेल सागायच. ५ – १० मिनिट लागतात बस ने . हनुमान रोड बस स्टोपच्या बरोबर समोर आहे हा मठ.

———————————————————————————————————————————————–

६. अंधेरी च्या मठात जाण्यासाठी अंधेरी WEST{रेलवेय स्टेशन } ला येऊन अंधेरी बस डेपो. 226 क्रमांकाची बस पकडायची. {बसच नाव आहे श्री स्वामी समर्थ मगर } स्टोप च नाव पण हेच सागायच. कोकिला बेन हॉस्पिटल नंतर हा स्टोप लागेच येतो.

———————————————————————————————————————————————–

७. कांदिवली (W) ला यायच . कांदिवली रेल वेय स्टेशन पासून जर आपण चालत गेलो तर १० -१५ मिनिटा वर आहे हा मठ. कांदिवली स्टेशन पासून जर बस केली तर वैशाली नगर बस स्टोप ला उतार्यच . बस स्टोप च्या समोर < राज हाइट नवाची इमारत > आहे त्याच्या पाठी मागे आहे हा मठ. रोडच नाव आहे M.G ROAD. तिथे गेल्या वर कोत्या हि दुकानदारला विचार सागेल तुमाला मार्थ कुठे आहे ते . ———————————————————————————————————————————————-

१०. ठाण्यात कोपरी बस स्टोप पासून चेंदणी कोलीवाद्याला जायला रोड आहे फक्त ५ मिनुताचा तिथे कोणाला जरी विचारले स्वामींचा माठ कुठे आहे ते सांगतील {किरण बल्लाळ }

———————————————————————————————————————————————–

११. डोंबिवलीचे दोनी मठ {EAST & WEST} हे डोबीवली स्टेशनच्या आस पासच आहेत.

———————————————————————————————————————————————–

12. Ambernath Math, Sivmandir Road, Swami samarth Chowk, Ambernath (East )

http://www.facebook.com/SWAMIHO

|| श्री स्वामी समर्थ ||

स्वामी आलात जीवनी माझ्या ,सोन पहाट होऊनी |

दारी प्राजक्ताचा सडा , सोन पाऊले अंगणी ||

डोई मध्यान्हीचा सूर्य , तप्त धरणी झाली |

ओढी मायेचा पदर , करी उचलुनी घेशी ||

सांजवेळी अवेळी , कधी कातरले मन |

गोष्टी प्रेमाच्या सांगून , आणी चित्त थाऱ्यावर ||

चंद्र नभीचा दिसतो , स्वामींच्याच स्वरूपात |

हिना भरुनी पावली , स्वामींच्या चिंतनात ||

रात्र सरकत गेली , झाली पहाट फिरून |

किलबिल पाखरांची , भासे स्वामींचा गजर ||

अशी चराचरावर माझ्या स्वामींची च सत्ता |

हिना म्हणे स्वामी नाम एकवटून घे चित्ता ||

—– हिना कारखानीस.

Rangoli Darshan Fesatival -2010

स्वामी भक्तांना अनुभवांनी हेच जाणवून देत आहेत कि,

 “हम गया नही, जिंदा है”

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ !!

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. कुणाला आपल्या कुलस्वामिनीच्या रुपात, तर कुणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक योग लीला दाखविल्या. परंतु अघोरी प्रथा व अंधश्रध्दा महाराजांना पसंत नव्हती व आपल्या भक्तांकडून या गोष्टीना खतपाणी मिळूनये याची काळजी महाराज घेत.

     श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य अलौकिक होते. त्यांच्या लीला सामान्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. स्वामींचे विविध जाती-धर्मांचे अनेक भक्त होते. परंतु महाराजांना त्यांच्या मनीचा भक्तीभाव विषेश प्रिय होता. कुणाच्या मनात काय चालले आहे हे महाराज चटकन ओळखत. कधी रागावून, कधी प्रेमाने तर कधी प्रत्यक्ष दाखले देऊन महाराज सामान्यांना भक्तीमार्गात आणत.

 

!! श्री स्वामी समर्थ !!

स्मरण श्री स्वामी समर्थ  करावें| अखंड नाम जपत जावें |नामस्मरणें पावावें| समाधान | नित्य नेम प्रातःकाळीं| माध्यानकाळीं सायंकाळीं |नामस्मरण सर्वकाळीं| करीत जावें | सुख दुःख उद्वेग चिंता| अथवा आनंदरूप असतां |नामस्मरणेंविण सर्वथा| राहोंच नये | हरुषकाळीं विषमकाळीं| पर्वकाळीं प्रस्तावकाळीं |विश्रांतिकाळीं निद्राकाळीं| नामस्मरण करावें | कोडें सांकडें संकट| नाना संसारखटपट |आवस्ता लागतां चटपट| नामस्मरण करावें | नामस्मरणानें  भगवंताचें स्मरण करावें. त्याचें नाम अखंड जपत जावें. नामस्मरणानें समाधान प्राप्त करुन घ्यावें. दिवसांतून मिळेल तेव्हां नामस्मरण करावें. : रोज नियमानें प्रात:काळी दुपारी आणि सायंकाळीं नामस्मरण श्री स्वामी समर्थ करावें. शिवाय जेव्हां वेळ मिळेल तेव्हां सर्व काळी नामस्मरण करावें. मनाच्या कोणत्याही अवस्थेंत श्री स्वामी समर्थ नाम सोडूं नये. : सुख असो, वा दु:खाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो, वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीची असली तरी नामस्मरणावांचून कधीहि राहूं नये. प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावें. काळ आनंदाचा असो वा कठिण काळ असो, मोठा पर्वकाळ असो कीं योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो कीं झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावें. एखादा कठिण प्रश्न निर्माण झालेला असो, कांहीं अडचण असो वा एखादें संकट आलेलें असो, प्रपंचातील अनेक खटपटी चालंलेल्या असो किंवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो वा एखादे संकट आलेलें असो, आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावें. दैनंनिन जीवनांत नामाचा सहज विसर पडतो. तो पडूं देऊं नयें : चालतांना, बोलतांना, आपला धंदा व्यवसाय करतांना खातांना, जेवतांना सुखानें स्वस्थ असतांना, अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग भोगताना आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरण विसरुं नये.

————————————————————————

 

“ह्या जगात  सगळे जन स्वामी भक्त नाहीत पण लवकरच ते होतील अशी मला खात्री आहे , तुम्हाला एक सांगतो मित्रानो जरी तुमचा स्वामींवर विश्वास नसला तरीसुध्धा  जेह्वा पण तुम्ही अडचणीत असाल तेह्वा फक्त मनापासून स्वामिना एकच हाक मारा श्री स्वामी समर्थ  आणि बघा स्वामी कसा चमत्कार करतात ते ,ह्या जगातील कुठली पण गोष्ट असून द्या ते तुम्हाला नक्कीच तुमची परीक्ष्या घेऊन देतील !हो कुठली पण गोष्ट,  जगात स्वामींना काहीही अशक्य नाही कारण हे जग  स्वामींचे आहे , तुम्हाला सर्व काही मिळू शकते फक्त स्वामिना सांगा आणि त्यामागे मेहनत घ्या ,हो ती मेहनत सुद्धा स्वामीच करून  घेणार आपल्याकडून! फक्त एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी आरती,मंत्र  म्हणावे आणि आपली प्रगती करून घ्यावी व फासिबूक चा वापर करणाऱ्या बांधवाना एक मनापासून विनंती करतो कि तुम्हाला आलेले अनुभव ,तुम्ही ज्या आरत्या नेहमी म्हणता आणि त्यामुळे आलेले अनुभव ,अनुभव आलेले मंत्र ह्या सर्वांचा आपल्या ग्रुप मध्ये समावेश करा …ह्यामुळे जे अजून स्वामी भक्त झाले नाही आहेत ते होतील आणि जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर सर्व जन भक्ती मार्गाला लागतील कारण “तहान लागल्यावर विहीर खोदण्यात काय अर्थ नाही ,आधीच विहीर खोदून ठेवा आणि जेह्वा संकटात येचाल तेह्वा त्यातील पाणी प्या …श्री स्वामी समर्थ …भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे …