सुखाचे क्षण हे उन्हात पडणा-या गाराप्रमाणे असतात. क्षणात वेचले गेले नाही तर गाळात विरून जातात.

अश्रू कितीही श्रेष्ठ व प्रेमाचे असले तरी गेलेले प्राण परत आणण्याचे सामर्थ्य त्यात नसते.

प्रगतीचा मार्ग चुकांच्या कट्याकुट्यातून जातो, जो या काट्याकुट्यांना भितो, त्याची कधीच प्रगती होत नाही.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे, जसा सूर्य झाकला जात नाही. तसेच  सत्य देखील झाकले जात नाही .

स्वतःच्या वाटेला कितीही काटे असले तरी दुस-याला  सुखद फुल देणे, हे मानवाचे परम कर्तव्य आहे.

ईश्वराच्या कृपेशिवाय मनुष्य केवळ आपल्या प्रयत्नाच्या जोरावर काहीही प्राप्त करू शकत नाही.

देशातील दारिद्र्य व अज्ञान  घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे.

घाम गाळल्याशिवाय मिळालेली धन-संपत्ती हि टिकाऊ नसते.

लोक निंदा करोत अगर प्रशंसा  परंतु धैर्यशील पुरुष स्वतःच्या मार्गावरून विचलित होत नाहीत.

अवदशेत सापडला कि मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो. पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीही जाणून घेत नाही.

परिस्थितीचा गुलाम होण्याऐवजी तिच्यावर मत करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

सतत दुःखाचा विचार करून आत्महत्या करण्यापेक्षा  ईश्वराला तळमळीने शरण जा तो तुम्हाला नक्कीच तारील.
थोर संत किंवा  थोर पुरुष असामान्य गोष्ट करत नाहीत, तर साध्याच गोष्टीना असामान्य करतात.

जो मनुष्य आपल्या बुद्धी व शक्तीचे माप काढून काम करण्यास सरसावतो, तो कधीही निराश होत नाही.

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे व ज्याला आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याला काहीही अशक्य  नाही. 

जोवरी पैसा तोवरी बैसा ही आजच्या जगाची रीत आहे.

जे काम आज करता येणे शक्य आहे, ते उद्यावर ढकलू नये.

चुकांची भीती बाळगू नका,  पण तीच चूक पुन्हा करू नका.

विचार बदलले  कि कृती बदलते व कृती बदलली कि कर्म पण, विचार बदलण्यासाठी मात्र मन ताब्यात असावे लागते.

स्वतः आचरण संपन्न होऊन दुस-याला नंतरच उपदेश करा. व्यर्थ भाषणबाजी करू नका. तुम्ही आचरण करत असाल तरच लोक तुमचा उपदेश ऐकतील.

स्वार्थी माणसाला दुसरा स्वार्थी भेटला तर जमिनीपर्यंत वाकून एकमेकांना भेटतात. पण या जगातील सर्व  इच्छांचा  त्याग केलेल्या निराधार पुरुषाला कुणी केवळ शब्दाने सुद्धा किंमत  देत नाही.

कोणतेही कार्य सुरु करण्याचे अगोदर ते कार्य करण्याचे प्रयोजन समजावून घेतले पाहिजे. प्रयोजन समजल्याशिवाय कार्यास आरंभ केल्यास त्या कार्याची हानी होते.

यश प्राप्त करावयाचे असल्यास त्यासाठी अनंत परिश्रम करावे लागतात. काही वेळेला सुरुवातीस त्यात अपयशही येते, पण त्यामुळे निराश न होता प्रयत्नांची पराकाष्टा करत राहिल्यास ते महान यश निश्चितच आपणास मिळते, म्हणू अपयशाने ते कार्य सोडू नका, पुन्हा प्रयत्नाला  लागा.

अतिशय कठीण प्रसंगातही जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवतो तोच खरा भक्त .

पैसा,धन,संपत्ती कमावणे योग्य असेलही,परंतु सात पिढ्यांसाठी त्याची तरतुद करणे हे कितपत योग्य आहे.विचार करा,तुम्हीच ठरवा…!

कृती करून विचार करण्यापेक्षा विचार करून कृती करा…!

जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा परीक्षार्थी असतो. जेव्हा तो कष्ट व जिद्द या दोन गोष्टी आत्मसाथ करतो,तेव्हाच तो जीवनाच्या परीक्षेत यशस्वीपणे  उत्तीर्ण होतो.

Advertisements