|| श्री स्वामी समर्थ ||

मला तुमच्याशी एक आत्ताच आलेला अनुभव शेअर करायचा आहे. माझे पती सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि त्यांना कळले कि त्यांचे पाकीट सापडत नाही आहे. बराच वेळ आम्ही दोघे शोधात होतो. काळजी वाटत होती कारण त्यामध्ये क्रेडीट कार्ड्स, पेन कार्ड सारखी महत्वाची डॉकुमेंत्स होती.

मी स्वामींकडे प्रार्थना केली कि ५ मिनिटांच्या आत आम्हाला पाकीट सापडू दे, आणि चमत्कार झाला. पाकीट जिकडे असेल असे वाटलेच नाही तिथे आम्ही शोधायला गेलो आणि ते सापडले. पाहायला हि खूप लहान गोष्ट वाटेल पण ज्या वेळी आपण एखादी वस्तू निकराने शोधात असतो पण सापडत नाही आणि अगदी हेल्पलेस झाल्यासारखे वाटते तेव्हां स्वामीची माया कळते .

स्वामींची कृपा अशीच आमच्यावर आणि सर्वांवर राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

मला माझा हा अनुभव स्वामिभाक्तांबरोबर शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

|| श्री स्वामी समर्थ ||

संतोषी पेडणेकर
एक स्वामी भक्त

Advertisements