“भुललो मी किती खोट्या या सुखांना धावे यांच्यामागे मी सदा स्वामी हो ……….! ||१|| सुखलोलुप मी स्वप्नात रंगतो नाम घेण्या तुमचे वेळ कुठे स्वामी हो. ..! ||२|| जीभ नाही ताब्यात मन स्वैर झाले होई कसे भले .? सांगावे स्वामी हो ………….! ||३|| बरबटले डोके विचार फिरले शांतीसाठी आलो सांभाळा स्वामी हो………….! ||४||

—————————————————————————————————————————————————–

” स्वामी समर्थ अक्कलकोटचे  चौथा अवतार दत्तात्रेयांचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ

तिसरे नृसिन्हसरस्वती, नाव शुभ  गाणगापूर दर्शन देव दुर्लभ  जागृत दत्तस्थान ते तेथे होवूनी साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार
अक्कलकोट पुण्यभूमी थोर  जेथे प्रत्यक्ष दत्त वसे”
Advertisements