‎||”अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तसदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”||
||श्री स्वामी समर्थाय नम:|| सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”

दत्त ऊर्फ दत्तात्रेय हा हिंदू धर्मातील एक देव व योगी आहे. हा अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत

[१]. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मा

नले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले
[२].दत्ताचा उल्लेख त्याचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, आणि महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे बंधू, ही दत्ताचे नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत.

दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते.सगुण प्रतीके उपलब्ध असलीतरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत पण उत्तरकाळातील दत्तभक्ती संप्रदयांनी जातिव्यवस्था बळकट होऊ देण्यास हातभार लावल्याचेही आढळून येते.

गुरुचरित्र हा दत्ताचे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांच्या बद्दलचा चरित्र ग्रंथ आहे गुरूचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे मुळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही सध्या उपलब्ध श्रीगुरूचरित्राची मराठी भाषेतील रचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी आणि रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असु शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे

सरस्वती गंगाधर हे नरसिंह सरस्वतीचे एक शिष्य सयंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.

ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.

मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे.”

Advertisements