|| श्री स्वामी समर्थ ||

स्वामी आलात जीवनी माझ्या ,सोन पहाट होऊनी |

दारी प्राजक्ताचा सडा , सोन पाऊले अंगणी ||

डोई मध्यान्हीचा सूर्य , तप्त धरणी झाली |

ओढी मायेचा पदर , करी उचलुनी घेशी ||

सांजवेळी अवेळी , कधी कातरले मन |

गोष्टी प्रेमाच्या सांगून , आणी चित्त थाऱ्यावर ||

चंद्र नभीचा दिसतो , स्वामींच्याच स्वरूपात |

हिना भरुनी पावली , स्वामींच्या चिंतनात ||

रात्र सरकत गेली , झाली पहाट फिरून |

किलबिल पाखरांची , भासे स्वामींचा गजर ||

अशी चराचरावर माझ्या स्वामींची च सत्ता |

हिना म्हणे स्वामी नाम एकवटून घे चित्ता ||

—– हिना कारखानीस.

Advertisements