श्री स्वामी समर्थ
महाराज एकदा आनंद वृत्तीने एका मंदिराजवळ बसलेले असताना
मंदिरात पुजारी आरतीची तयारी करत होता
तेवढ्यात एक उंदीर देवघराजवळ इकडून तिकडे फिरताना
बघून पुजारी त्याला जवळील चंदनाच्या लाकडाने मारतो
तत्क्षणी त्याचा प्राण जातो
त्या उन्दिराला पकडून बाहेर फेकून येताना महाराज त्याला म्हणतात
” त्या उन्दिराला माझ्या जवळ घेऊन ये , तो पुन्हा देवघरात नाही जाणार ”
जवळील सर्व लोक महाराजांना तो उंदीर मेला आहे हे सांगतात
महाराज त्या उन्दिराला पकडून म्हणतात ” उठ आता आणि जा तुझ्या जागेवर ”
पुन्हा मंदिरात येऊ नकोस असे म्हणताच तो उंदीर बिलाजवळ जावून थांबतो
सर्व जन आश्चर्य चकित होतात
महाराजांचे माणसा प्रमाणे प्राणी मात्रांवर हि खूप प्रेम होते
ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

Advertisements