स्वामी भक्तांना अनुभवांनी हेच जाणवून देत आहेत कि,

 “हम गया नही, जिंदा है”

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ !!

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. कुणाला आपल्या कुलस्वामिनीच्या रुपात, तर कुणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक योग लीला दाखविल्या. परंतु अघोरी प्रथा व अंधश्रध्दा महाराजांना पसंत नव्हती व आपल्या भक्तांकडून या गोष्टीना खतपाणी मिळूनये याची काळजी महाराज घेत.

     श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य अलौकिक होते. त्यांच्या लीला सामान्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. स्वामींचे विविध जाती-धर्मांचे अनेक भक्त होते. परंतु महाराजांना त्यांच्या मनीचा भक्तीभाव विषेश प्रिय होता. कुणाच्या मनात काय चालले आहे हे महाराज चटकन ओळखत. कधी रागावून, कधी प्रेमाने तर कधी प्रत्यक्ष दाखले देऊन महाराज सामान्यांना भक्तीमार्गात आणत.

Advertisements