!! श्री स्वामी समर्थ !!

स्मरण श्री स्वामी समर्थ  करावें| अखंड नाम जपत जावें |नामस्मरणें पावावें| समाधान | नित्य नेम प्रातःकाळीं| माध्यानकाळीं सायंकाळीं |नामस्मरण सर्वकाळीं| करीत जावें | सुख दुःख उद्वेग चिंता| अथवा आनंदरूप असतां |नामस्मरणेंविण सर्वथा| राहोंच नये | हरुषकाळीं विषमकाळीं| पर्वकाळीं प्रस्तावकाळीं |विश्रांतिकाळीं निद्राकाळीं| नामस्मरण करावें | कोडें सांकडें संकट| नाना संसारखटपट |आवस्ता लागतां चटपट| नामस्मरण करावें | नामस्मरणानें  भगवंताचें स्मरण करावें. त्याचें नाम अखंड जपत जावें. नामस्मरणानें समाधान प्राप्त करुन घ्यावें. दिवसांतून मिळेल तेव्हां नामस्मरण करावें. : रोज नियमानें प्रात:काळी दुपारी आणि सायंकाळीं नामस्मरण श्री स्वामी समर्थ करावें. शिवाय जेव्हां वेळ मिळेल तेव्हां सर्व काळी नामस्मरण करावें. मनाच्या कोणत्याही अवस्थेंत श्री स्वामी समर्थ नाम सोडूं नये. : सुख असो, वा दु:खाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो, वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीची असली तरी नामस्मरणावांचून कधीहि राहूं नये. प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावें. काळ आनंदाचा असो वा कठिण काळ असो, मोठा पर्वकाळ असो कीं योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो कीं झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावें. एखादा कठिण प्रश्न निर्माण झालेला असो, कांहीं अडचण असो वा एखादें संकट आलेलें असो, प्रपंचातील अनेक खटपटी चालंलेल्या असो किंवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो वा एखादे संकट आलेलें असो, आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावें. दैनंनिन जीवनांत नामाचा सहज विसर पडतो. तो पडूं देऊं नयें : चालतांना, बोलतांना, आपला धंदा व्यवसाय करतांना खातांना, जेवतांना सुखानें स्वस्थ असतांना, अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग भोगताना आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरण विसरुं नये.

————————————————————————

 

Advertisements