!! श्री स्वामी समर्थ !!

“अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकर्यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकर्यांस म्हणाले, ”अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बर. त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !” सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहिशी झाली.

——————————————

http://www.facebook.com/Swamidarshan