” एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवर बसून आले होते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले, ”तुझे मोठेपण तुझ्या घरात. ते येथे कशाला पाहिजे? आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो.” तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत. 

——————————————————————-

     अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ”तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.” तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ”मला अजून आपली सेवा करावयाची आहे!” तात्या भोसले यांनी त्या यमदूताला  पाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ”हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा !” त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

 

Advertisements