****श्री स्वामी समर्थ*****

स्वामी समर्थ माझे दु:ख आवळून जा
आता या आसवांच्या वाती वळून जा

नेहमीच प्रश्न माझ्या उरत वसले
तुला भेटण्यास जीव आता उरले
स्वामी तुझा आशीर्वाद मज देऊन जा
आता या आसवांच्या वाती वळून जा

आक्रीत असे घडावे तो काळ ही यावा
म्हणुनी करतो आज स्वमिचाच धावा
तुझ्या कृपेची सावली पांघरून जा
आता या आसवांच्या वाती वळून जा

केली न कधी मी पर्वा या जीवनाची
होती तुला काळजी ? या बिचाऱ्याची
ते अजाण बाहू तुझे दाखवून जा
आता या आसवांच्या वाती वळून जा
———————————
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

Advertisements