**”जिथे कुलदेवता तिथे गुरु व जिथे शक्ती तिथे दत्त”**

प्रत्येक कुलाची एक विशिष्ट कुलदेवता आहे. कुलदेवतेची आराधना सर्वश्रेष्ठ मानली आहे. “जिथे गुरु तिथे कुलदेवता व जिथे शक्ती तिथे दत्त” अर्थात कुलदेवतेची उपासना केली असता गुरुही प्रसन्न होतात. स्वामींनी दिलेले जगदंबेच्या रुपात दिलेले दर्शन आपल्याला कुलस्वामिनीशी असणारे एकरूपताच दर्शवते. निरपेक्ष प्रेमाची पूर्णता मातृहृदयातच पाहावयास सापडते. बालकाचे सहस्र अपराध पोटात घालून क्षमा करणे, पोटाशी धरून कुरवाळणे व त्याची अपेक्षा पूर्ण करणे ही मातेची सहज प्रवृत्ती असते. नवरात्रात कुलस्वामिनी तत्काळ प्रसन्न होते तेव्हा या नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करूया हीच सदिच्छा

******—————————————————————————-******

Advertisements