|| कृपा सिन्धु श्री स्वामी समर्थ ||
“काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

———————————————————————————————

“कधी कधी आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ,खूप जिव लावतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात व दुःख देतात.लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.”

—————————————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
“स्वामी माझी माय माऊली, तप्त उन्हातील सावली, चेतविला ज्यांनी दीप भक्तिचा,त्यांना त्यांना ही पावली!!! स्वामी माऊली भक्तिची भुकेली,स्वामी माऊली स्मरा दिनरात,होईल दुःख दूर भक्तांचे सारे,निरंतर सुख पडेल पदरात..!!!
|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

——————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||
“आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात किमान दर गुरवारी तरी ‘श्री स्वामी समर्थ सगुन दर्शनाचा लाभ’ घेण्यासाठी कुटुंबl बरोबर वेळ काढावा व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा.समर्थ दर्शनाने सुद्धा आपले कितीतरी दुःख दूर होतात. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.”

—————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||
जीवनात” श्री स्वामी समर्थाची सेवा व निश्चित धेय” असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगति करेल.पण धेयशुन्य माणुस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहचणार नाही.आपले धेय आजच ठरवा.!!
“जो|| श्री स्वामी समर्थ || महाराज्यांच्या चरणी मनापासून शरण जाइल ,महाराज त्याच्या योगक्षेम निश्चित चालवतात,व सदैव त्याच्या पाठीशी असतात.”

——————————————————————————

| श्री स्वामी समर्थ ||
“दुखी माणसास हिमत ,धैर्य,आधार,दिलासा देवून त्याच्या मुखावारिल हरवलेले हास्य पुन्हा निर्माण करणे व त्याला स्वामींच्या सानिध्यात घेउन येणे.ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा होय.”

—————————————————————————-

“आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्वाचा आहे. त्याचा सदुपयोग करावा. कायम काहींना काही कामात व्यग्र राहावे. श्री स्वामींच्या नामस्मरणात मन गुंतवावे. भरपूर वाचन करावे. “.

—————————————————————————–

स्वामी भक्तीचा मार्ग कोणता ही असू दया पण मनापासून व निशंक सेवा करण्याऱ्या स्वामी सेवाकाच्या पाठीशी सदेव स्वामी असतात हे मात्र निच्छित……!!!

——————————————————————————–

“आपल्याला मिळालेले अध्यात्मिक मार्गदर्शन, ज्ञान व स्वामींचे आलेले अनुभव हे इतरांना सांगावेत व त्यांना ही स्वामी सेवेसाठी प्रवृत्त करावे.भगवान श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” या वचनाची नेहमी जाण ठेवावी.”

—————————————————————————————————

जो जीवनभर नियमित भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे त्यांच्या अंतकाली भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभूत असे सत्य आहे.

————————————————————————-

‘जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन”

Advertisements