!!श्री स्वामी समर्थ!!
!!श्री स्वामी समर्थ!!! हे नाम जरी मुखी आले तरी लगेच डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामी माउली. माउलीचे आपल्याभक्तावर…आपल्या लेकरावर किती माया आहे हे तिच्या डोळ्यातूनच कळते….तिचे प्रेम,तिची माया, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ती आपल्या पाठीशी आहे ह्यातच ह्या जन्माचे सार्थक आहे……हे आयुष्य आपल्याला का मिळाले ह्याचे उत्तर इथेच सापडते……जो स्वमिनामाचा महिमा जाणतो,ज्याने हे अनुभवले आहे त्यालाच हे बोल पटतील….. “जे जे आमुचे सद्भक्त !निष्काम भक्तीमाजी रत!!
“चिंता तयाची आम्हा बहुत!येवू धावत संकटी!!!
—असा महाराजांनी आपल्या भक्तांना दिलासा दिला आहे.त्यामुळेच का कोण जाणे स्वामी भक्त सदैव निर्भय असतात.माणसाचे जीवन म्हटले तर सुखः अथवा दुखः हे येणारच…जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे असा विश्वास ठेऊन त्याचा स्वीकार केला तर आयुष्य अतिशय सुंदर होईल.स्वामीन चरणी श्रद्धा ठेऊन आपले सर्वस्व त्या माऊली कडे सोपवावे.. 

—————————————————————————————————————————————————

                                                   http://www.facebook.com/swamidarshan