Ravindra Natya Mandir, Prabhadevi ; (Mini Theatre)

Mumbai, Maharashtra..
Tuesday, July 26 · 4:30pm – 7:30pm
स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या ९व्या स्मृतिदिनानिमित्त एक अनोखा कार्यक्रम — ” बाबूजी-एक सुंदर स्वरयात्रा”… श्री.सुधीर फडके यांचे संगीत,त्यांची गायकी,संगीतातील त्यांची श्रद्धास्थाने, त्यांची बलस्थाने या व अशा सर्व वैशिष्ट्यांचा संगीतातील चिरंतन मूल्यांच्या संदर्भात केलेला मूलगामी विचार हे या प्रयोगाचे प्रयोजन आहे. या सोबत त्यांची त्या त्या मूल्याच्या अनुषंगाने येणारी उत्तमोत्तम व काही दुर्मिळ अशी गीते…हा ही या कार्यक्रमाचा भाग… आहे. श्री.सुधीर फडके यांचा दीर्घकाळ सहवास व स्नेह लाभलेले, त्याचप्रमाणे स्वतः एक उत्तम गायक व चिंतनशील संगीतकार असलेले माझे वडील, श्री.वसंत आजगावकर यांचे मर्मज्ञ व विचारप्रवर्तक निवेदन हे या कार्यक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कार्यक्रम सर्वांना खुला आहे ..प्रथम येणारयास प्राधान्य अशी बैठक व्यवस्था आहे.काही जागा राखीव असतील. आपणास आपल्या संगीत-रसिक आप्त-स्नेह्यांसह सप्रेम निमंत्रण आहे…… धन्यवाद..!!
जरूर भेटूया ….!
   आपला ,   निनाद आजगावकर.
Advertisements