Saturday, August 13 · 7:00pm – 9:00pm
Chabildas High School, Near Ideal Book Depot, Dadar (West), Mumbai.
श्री शंकर महाराज प्रतिष्ठान, मुंबई हि संस्था सन २००० साली मुंबई येथे स्थापन झाली. या संस्थेच्या वतीने गेली चार वर्षापासून श्री शंकर महाराजांची मासिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात येत आहे. ही प्रार्थना प्रत्येक महिनाच्या १३ तारखेला छबिलदास हायस्कूल, आयडीयल बुक डेपोजवळ, दादर (पश्चिम), मुंबई येथे सायंकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येते. या प्रार्थनेत हौल भरून भक्तांची हजेरी लागते. प्रार्थनेला आल्याने आपली कामे होतात अशी भक…्तांची दृढ श्रद्धा आहे. त्यांना महाराजांची प्रचीती येते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. या प्रार्थनेत एक तास अध्यात्माचे साधक, उपासक व आभ्यासक व्याख्यान देण्यास येतात. या मान्यवरांचे प्रवचने बोधपर असते. आजपर्यंत सुमारे ४० मान्यवर विद्वानांनी आपले विचार भक्तांपर्यंत पोहोचवले. तसेच या प्रार्थनेत सिद्धावस्थेतील महान अवलियाही येतात. त्यांच्या दर्शनाचा व सत्संगाचा लाभ भक्तांना येतो. म्हणूनच हा उपक्रम ५० महिने अविरत चालला आहे. तरी आपणही या प्रार्थनेला अवश्य यावे. आमच्या संस्थेच्या वतीने श्री सदगुरू शंकर महाराजांचा प्रगट दिन व पुण्यतिथी ही दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. श्री शंकर महाराजांचे वर्षातले दोन उत्सव व १२ प्रार्थना अशी एकूण १४ कार्येक्रम संस्थेमार्फत साजरे करून महाराजांचा प्रचार आणि प्रसार मुंबईसह संपूर्ण जगात केला.
|| जय शंकर ||
|| श्री स्वामी समर्थ |
Advertisements