!! “स्वामी समर्थ तारक मंत्र” !!

नि:शंक हो | निर्भय हो मना रे |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ||
अतॅ क्य अवधूत हे स्मरण गामी |
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे |
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |
नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||3||
खरा होई जागा | श्रद्धेसहित |
कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात |
नको डगमगू | स्वामी देतील साथ ||4 ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ |
स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |
न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||
* कोणत्याही संकट आल्यास स्वामींचा हा अदभुत तारक मंत्र म्हणावा संकट दूर होतात *
Advertisements