प्रतीज्ञा

\\ श्री स्वामी समर्थ \\
प. पु. गुरुमाउली अण्णासाहेब माझी गुरुमाउली आहे. माझ्या गुरुमाउलींवर माझे प्रेम आहे. माझ्या गुरुमाउलींचा व माझ्या गुरुमाउली मध्ये असलेल्या चौदा विद्या ,चौसष्ट कलांचा मला अभिमान आहे. या चौदा विद्या ,चौसष्ट कलांची प्राप्ती करून घेण्याचा मी सदेव प्रयत्न करीन.
मी माझ्या गुरुमाउलींचा माझ्या माता-पित्यांचा व केंद्रातील सर्व सेवेकरी बंधू आणि माता भगीनिंचा मान ठेवीन व त्यांच्याशी सदेव प्रेमलतेने वागण्याचा प्रयत्न करीन.जीवनात अहंकार, क्रोध, गर्व, या तीन गोष्टींचे विसर्जन करून दया, क्षमा, शांति, या तीन गोष्टी अंगी बाळगून माझ्या गुरुमाउलींना भूशनावह होईल असे वागण्याचा व माझ्या गुरुमाउलींच्या इच्छेत इच्हा मिळून राहण्याचा मी सदेव प्रयत्न करीन. दु:खितांची दु:खातून झालेली मुक्ती व त्याना प्राप्त झालेले सुख यातच माझे सर्व काही सामावलेले असून हाच माझ्या जीवनातील खरा आनंद होय. जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहून जगातील जनमानसास भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांच्या सेवेचे महत्व समजून सांगण्याचा व मला प्राप्त झालेले ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करील. जीवनात भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांची सेवा हाच माझा व्यवसाय व प. पु. गुरुमाउलींचा आशीर्वाद हीच माझी सुख संपत्ती आहे.

Advertisements