By-Deeksha Harmalkar

 1.  “गुरू” या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।” असे वर्णन करून त्याला नमन केले आहे. यात गुरूला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात, “गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।” इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. “परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ.” असे दुस-या एका ठिकाणी म्हंटले गेले आहे. “गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।”, “बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ” यासारखी कांही नकारात्मक अर्थाची पदेही आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण कांहीच करू शकत नाही असा नकारात्मक संदेश त्यातून दिला जातो आणि आपल्या प्रयत्नातली उणीव झाकायला एक निमित्य मिळते.
 2. महर्षी व्यासांनी सुद्धा एकलव्याच्या गोष्टीतून या मिथकातील फोलपणा दाखवून दिला आहे. गुरु द्रोणाचार्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन तर त्याला मिळाले नव्हतेच, त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले सुद्धा नव्हते. तरीही द्रोणाचार्यांनी कौरव व पांडव या आपल्या शिष्यांना दिलेल्या शिकवणीचे ती अपरोक्षपणे ऐकून आणि तिचे नुसते अनुकरण करून एकलव्याने धनुर्विद्येमध्ये विलक्षण प्राविण्य प्राप्त केले होते.
 3. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
  गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः l
 4. दुखे: संकटे स्वामी जाणती !!
  कधी न मुखाने बोलावे!!
  शरणागत भक्ताची सावलीप्रमाणे सोबत करणे हे स्वामींचे ब्रीद आहे.त्रिभुवन संचारी त्रैलोक्याचालक स्वामी हे चराचरातील प्रत्येक प्राणिमात्रांच्या प्रत्येक श्वासाची नोंद घेत असतात.त्यामुळे दुखः ,संकटाविषयी गाऱ्हाणे साधकाने समर्थांकडे घेऊन जाण्याची गरजच पडत नाही.कारण आपले स्वामी अंतर्ज्ञानी आहेत.
  !!!श्री स्वामी समर्थ!!!

http://www.facebook.com/swamidarshan

Advertisements