||श्री स्वामी समर्थ||

 गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न श्री स्वामी समर्थ सेवा परिवार,भुईगांव आयोजित रुद्राभिषेक.सुश्राव्य किर्तन,महाप्रसाद, हरिपाठ,महाआरती अशा दिवसभराच्या भक्तिमय वातावरणात हजारो स्वामीभक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. उत्सवाचा योग साधून … आमदार मा.विवेक पंडीत,पंडीत सुरुशे यांच्या हस्ते उपासनेच्या सी. डी. चे श्री स्वामी नामाच्या गजरात प्रकाशन करण्यात आले.श्री संदीप म्हात्रे यांची कल्पना, पंडीत सुरुशे यांचे संयोजन व गायन आणि मठातील सेवेकरी श्री प्रकाश राणे,कु दक्षता तेली यांचे योगदान या त्रिवेणी संगमातून ही सी. डी. साकार झाली.या सीड़ी. चे सेवामूल्य रु.६० ठेवण्यात आले आहे.या मठात होणारी उपासना भक्तांना आपल्या घरी करता यावी या साठी बनविलेली ही सी. डी.भक्तांसाठी उपलब्ध करतांना आम्हाला अनंद होत आहे. ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||

Advertisements