!!!श्री स्वामी समर्थ!! !!श्री स्वामी समर्थ!!!

हे नाम जरी मुखी आले तरी लगेच डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामी माउली. माउलीचे आपल्या भक्तावर…आपल्या लेकरावर किती माया आहे हे तिच्या डोळ्यातूनच कळते….तिचे प्रेम,तिची माया, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ती आपल्या पाठीशी आहे ह्यातच ह्या जन्माचे सार्थक आहे……हे आयुष्य आपल्याला का मिळाले ह्याचे उत्तर इथेच सापडते……जो स्वमिनामाचा महिमा जाणतो,ज्याने हे अनुभवले आहे त्यालाच हे बोल पटतील…..

“जे जे आमुचे सद्भक्त !निष्काम भक्तीमाजी रत!! “चिंता तयाची आम्हा बहुत!येवू धावत संकटी!!! —

असा महाराजांनी आपल्या भक्तांना दिलासा दिला आहे.त्यामुळेच का कोण जाणे स्वामी भक्त सदैव निर्भय असतात.माणसाचे जीवन म्हटले तर सुखः अथवा दुखः हे येणारच…जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे असा विश्वास ठेऊन त्याचा स्वीकार केला तर आयुष्य अतिशय सुंदर होईल.स्वामीन चरणी श्रद्धा ठेऊन आपले सर्वस्व त्या माऊली कडे सोपवावे….आपल्या पुर्व्कार्मानुसार आपल्यावर संकटे येणारच पण स्वामींच्या नित्य नामस्मरणाने ती सौम्य होतात…..'”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे”‘हे स्वामींचे भक्तांना अभिवचन आहे.संकटात असताना स्वामिसेवा केलीत तर संकटविमोचन होते…..पण सुखात असताना स्वामींचे नाम घेतलेत तर स्वामी आपल्या भक्तां पर्यंत संकटे येउच देत नाहीत…..ते आपला सांभाळ करतात . आजच्या कलियुगात तर माणसाचे जीवन तर बऱ्याच आधी व्याधी ,अशांती ने ग्रासले आहे……म्हणूनच ह्या युगात !!श्री स्वामी समर्थ!!नामाचा महिमा अगाध आहे…..म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्थैर्य ,शांती,समाधान मिळवण्यासाठी आपले भरकटणारे मन स्वमिनामामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे.आपण स्वमिनामामध्ये गुंतून राहिलात तर सर्व चिंतांना जिंकू शकता….स्वमिनामामुळे आपल्याला सुखः दुखः ह्याचा विसर पडतो……कशाची चिंता करायची आणि कशाची नाही हे कळायला लागते. गुरु हे जीवनाचे सारथी असतात.ते आपल्या शिष्याचे जीवन मार्गी लावतात.आणि आपले हे परमभाग्य कि ह्या जन्मात आपल्याला श्री स्वामी समर्थ हे परम सद्गुरू म्हणून लाभले आहेत….”हे देवा स्वामी समर्थ माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तुझा आहे….तुझ्या इच्छेने माझे जीवन जाऊदे….तुझ्या चरणांची धूळ सदैव माझ्या मस्तकी लागुदे.तुझी कृपा अखंड असुदे….अखेरच्या श्वासापर्यंत तुझे नाम मुखात असुदे हीच तुझ्या चरणी ह्या लेकराची प्रार्थना ” ..

BY -मेघना इंदुलकर-वैद्य.

Advertisements