प.पू.गुरुमाउली संदेश : गुरुपौर्णिमा

ll श्री स्वामी समर्थ ll

आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारे पूजा यज्ञविधि ग्रंथाप्रमाने अभिषेकासह सकाळी भूपाली आरतीनंतर करावी. त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणुन प्राशन करावे.

अकाल मृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं l

श्री स्वामी समर्थ पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम ll

यानंतर प्रत्येक सेवेकर्याने ११ माळी ll श्री स्वामी समर्थ ll या मंत्राचा जप व एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे करावे. आपले गुरु, सदगुरु, परमगुरु, परात्परगुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यासाठी जे स्वताला सेवेकारी म्हणुन घेतात, त्यानी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे. हा गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे. त्यानंतर ठीक १०.३० वाजता नैवेद्य आरती करावी.

गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जान l

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः l

गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नमः l

श्री स्वामी समर्थ चरनार्पन्मस्तु l

Advertisements